हिंगणघाट जळीत प्रकरण; आरोपी एकटाच की सोबत होता सहकारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 04:32 PM2020-02-05T16:32:13+5:302020-02-05T16:33:39+5:30

हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील आरोपी घटनेच्यावेळी एकटाच होता की त्याच्यासोबत कुणी सहकारी होता याची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी सीसीटीव्हीचे चित्रिकरण पोलिसांकडून तपासले जात आहे.

Hinganghat burning case; Was the accused alone or with the accomplice? | हिंगणघाट जळीत प्रकरण; आरोपी एकटाच की सोबत होता सहकारी?

हिंगणघाट जळीत प्रकरण; आरोपी एकटाच की सोबत होता सहकारी?

Next
ठळक मुद्देसीसीटीव्ही चित्रिकरणाची तपासणी सुरू आतापर्यंतच्या बयाणात एकाचाच उल्लेख

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला हिंगणघाट पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या मदतीने अटक करून त्याची शनिवार ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. असे असले तरी घटनेच्यावेळी आरोपी एकटाच होता की त्याच्यासोबत कुणी सहकारी होता याची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरातील आणि विविध पेट्रोलपंपांवरील सीसीटीव्हीचे चित्रिकरण पोलिसांकडून तपासले जात आहे. त्यासाठी पोलिसांच्या सुमारे दोन चमू रवाना करण्यात आल्या असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर खात्रीदायक पोलीस सूत्रांनी सांगितले.
प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या सूचनेवरून या प्रकरणाचा तपास तातडीने पुलगाव येथील महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे वळता करण्यात आला. आतापर्यंतच्या तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे अकरा व्यक्तींचे बयाण नोंदविले आहे. परंतु, या सर्व बयाणांमध्ये आरोपी एकटाच होता असा उल्लेख आल्याने नागरिकांमध्ये होत असलेल्या सहआरोपीबाबतच्या चर्चेची पडताळणी करण्यासाठी सीसीटीव्हीचे चित्रिकरण पोलिसांकडून तपासले जात आहे. तर आरोपीने गुन्ह्यात वापरलेले दुचाकी, ज्या प्लास्टिकच्या शिशीत आरोपीने पेट्रोल काढून ते पीडितेच्या अंगावर फेकले ती प्लास्टिकची शिशी, टेंभा, आरोपीचे कपडे आदी साहित्य जप्त केले आहे. शिवाय घटनास्थळावरून पेट्रोल मिश्रीत आणि साध्या मातीचे नमुने पोलिसांनी घेतले आहे. घटनेच्यावेळी आरोपीसोबत आणखी कुणी होता काय याची पडताळणी युद्धपातळीवर पोलिसांकडून केली जात आहे.

आरोपीचे बदलविले जातेय लोकेशन
हिंगणघाट येथील घटनेनंतर जनसामान्यांच्या संतप्त भावना आणि या प्रकरणातील आरोपीच्या सुरक्षा हा हेतू केंद्रस्थानी ठेऊन पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी इतर पोलीस ठाण्याच्या कोठडीत हलविले जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला हिंगणघाट येथे ठेवण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर आरोपीला वर्धा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र लगेच बुधवारी आरोपीला समुद्रपूर पोलिस ठाण्याकडे रवाना करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पोलीस सदर पाऊल उचलत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
अलीकडेच लागली होती नोकरी
विकेश नगराळे हा दहावीनंतर आयटीआय मधून ईलेक्ट्रिशीयनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी होता. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करून त्याला लगेच नोकरी लागली नाही. त्यामुळे तो लहान मोठे कामे तालुक्यासह ग्रामीण भागात करीत होता. अलीकडेच त्याला बल्लारशा रेल्वेस्थानकावर खासगी कंत्राटदाराकडे इलेक्ट्रिशीयनच्या कामासाठी नोकरी लागाली होती. त्यामुळे आरोपी व त्याचे कुटुंबीय बºयापैकी आनंदी होते. गतवर्षी त्याचा विवाह पार पडला. त्याला तीन महिन्याचा मुलगा आहे. पत्नी, मुलगा, आई-वडिल व बहिण हा सर्व परिवार अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया एका गावात संयुक्तरित्या राहत होता. विकेश इयत्ता आठवी, नववी पासूनच पीडितेच्या कुटुंबीयांना ओळखत होता. गावातही या दोन कुटुंबीयांची माहिती नागरिकांना होती. सदर गाव अत्यंत शांतताप्रिय गाव म्हणून तालुक्यात ओळखले जाते. या घटने नंतर शेकडोच्या जमावाने गावातील रस्त्यावर उतरून मोर्चा काढला. आरोपीच्या घरासमोरूनही मोर्चा गेला. मात्र, गावकºयांनी संयम राखून गावात अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घेतली. मात्र, या घटनेचा प्रचंड संताप सर्वत्र व्यक्त होत आहे.
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा सखोल तपास केल्या जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने प्रत्येक ठोस पुरावा गोळा केला जात आहे. शिवाय तपास पुर्ण करून लवकरात लवकर आरोपीविरुद्धचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात येईल.
- तृप्ती जाधव, तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव.


 

Web Title: Hinganghat burning case; Was the accused alone or with the accomplice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.