हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 23:24 IST2020-02-19T23:24:37+5:302020-02-19T23:24:43+5:30
विकेशला १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न?
श्याम उपाध्याय
वर्धा : हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जाळून मारण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या विकेश नगराळे या आरोपीने नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात फाशी लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सोमवारी घडल्याचे सांगितले जात आहे. आरोपीला यात काहीही झाले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विकेशला १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणांवरुन त्याला कारागृहातील अंडासेलमध्ये ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी विकेशने फाशी लावण्याचा प्रयत्न केला. यासंबंधात नागपूर कारागृह प्रशासनाने वर्ध्यातील अधिकारी तसेच तपास अधिकाºयांना याची माहिती दिली आहे. यासंदर्भात कुणीही अधिकारी अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही.