शिवरायांचा इतिहास हिंदू-मुस्लीम व रयतेच्या ऐक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:34 AM2018-02-27T00:34:43+5:302018-02-27T00:34:43+5:30
दगडफोड्या ते वैज्ञानिकांपर्यंत सर्वच बहुजन मोक्ष मिळविण्यासाठी रांगेत उभे आहेत; पण जगात मोक्ष मिळाल्याची कुठेच नोंद नाही, हे वास्तव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदू-मुस्लीम व रयतेच्या ऐक्याचा होता.
आॅनलाईन लोकमत
आर्वी : दगडफोड्या ते वैज्ञानिकांपर्यंत सर्वच बहुजन मोक्ष मिळविण्यासाठी रांगेत उभे आहेत; पण जगात मोक्ष मिळाल्याची कुठेच नोंद नाही, हे वास्तव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदू-मुस्लीम व रयतेच्या ऐक्याचा होता. ढाल, तलवारी पलिकडेही त्यांचे रयतेच्या हितार्थ बहुमूल्य कार्य आहे. यासाठी दगाबाज इतिहासकारांची दांभिक वृत्ती बहुजनांनी लक्षात घेण्याची गरज आहे, असा इशारा मराठा सेवा संघाचे प्रसिद्ध प्रवक्ता गंगाधर बनकरे यांनी दिला.
मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजयंती महोत्सवानिमित्त शनिवारी सायंकाळी ६ वाजता गांधी विद्यालय येथे शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज, एक लोककल्याणकारी राजे’ असा प्रबोधनाचा विषय होता. यावर ते बोलत होते. लढाई पलिकडचे शिवाजी महाराज यावर बनबरे यांनी विचार मांडून शिवरायांनी रयतेसाठी केलेले लोककल्याणकारी कार्य, महाराजांचा लढायांपलिकडचा जाज्वल्य इतिहास कथन केला. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष अंधारे तर प्रमुख अतिथी म्हणून राहुल ठाकरे, बाळा नांदुरकर उपस्थित होते.
ठाकरे यांनी शिवरायांच्या स्वराज्यात शेतकरी व रयतेला आपले राज्य व राजाबाबत किती आस्था, आदर होता. जीवा-भावाची सर्वजाती धर्माची माणसं शिवरायांनी जोडली व स्वराज्य स्थापन केले. जगाच्या पाठीवर असा अलौकिक राजा पुन्हा होणे नाही, असे सांगितले. नांदुरकर यांनीही छत्रपती शिवरायांचे ॠण भारतीय समाज कधीही फेडू शकणार नाही, असे सांगितले.
राजमाता जिजाऊ, शिवराय व गाडगे महाराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक विरेंद्र कडू यांनी केले. स्वागताध्यक्ष अॅड. सुरेंद्र जाणे यांनी छत्रपतींच्या राजमुद्रेबाबत माहिती दिली. यावेळी राजू वानखडे, सुधीर गिºहे, मंगेश विधळे, योगिता इंगळे, संजय इंगळे, उपाध्यक्ष वंदना गावंडे, निरज बुटे, मंगेश जगताप, राजू वानखडे उपस्थित होते. संचालन प्रफुल्ल क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रा. विजय चौधरी यांनी मानले. यावेळी राहुल ठाकरे, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, आशा चौधरी, वैशाली ठाकरे, बाल नगराध्यक्ष ध्रुव शेंडे आदींचा शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.