माजी नगरसेवकाच्या मालकीचे होर्डिंग जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:00 PM2018-09-03T23:00:01+5:302018-09-03T23:00:17+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत होणाºया कामांना अडथळा ठरणारे स्थानिक बजाज चौकातील तीन होर्डिंग सोमवारी न.प.च्या अधिकाºयांनी हटवून ते जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या तीन होर्डिंगपैकी दोन होर्डिंग काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या मालकीचे आहे. न.प. प्रशासनाने दिलेल्या मौखिक सूचनांकडे पाठ दाखविण्यात आल्याने ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत होणाºया कामांना अडथळा ठरणारे स्थानिक बजाज चौकातील तीन होर्डिंग सोमवारी न.प.च्या अधिकाºयांनी हटवून ते जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या तीन होर्डिंगपैकी दोन होर्डिंग काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या मालकीचे आहे. न.प. प्रशासनाने दिलेल्या मौखिक सूचनांकडे पाठ दाखविण्यात आल्याने ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले.
वर्धा शहरात सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत होत असलेल्या कामांना अडथळा ठरणारे सुमारे १५ होर्डिंग त्वरित हटविण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी वर्धा न.प. प्रशासनाला दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वर्धा न. प. प्रशासनाने सदर १५ होर्डिंग मालकांना त्यांच्या मालकीचे होर्डिंग स्वत:च काढून घेण्याच्या मौखिक सूचना दिल्या आहेत. न. प. च्यावतीने देण्यात आलेल्या मौखिक सूचनांना होल्डींग मालक फाटाच देत असल्याने सोमवारपासून न. प. प्रशासनाने होर्डिंग हटाव मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी न. प. अधिकारी आणि कर्मचाºयांची विशेष चमूही तयार करण्यात आली आहे. या चमूने सोमवारी स्थानिक बजाज चौक येथील तीन होर्डिंग काढून ते जप्त केले आहे. जप्त केलेल्या होर्डिंगमध्ये दोन होर्डिंग काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या मालकीचे असल्याचे न.प.च्या अधिकाºयांनी सांगितले.
ही कारवाई जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या सूचनेवरून तसेच वर्धा नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी वाघमळे, प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या मार्गदर्शनात नगर परिषदेचे निखिल लोहवे, गजानन पेटकर, अशोक ठाकूर यांच्यासह न.प. कर्मचाºयांनी केली.