नागपूर कराराची केली होळी
By Admin | Published: September 29, 2016 12:49 AM2016-09-29T00:49:51+5:302016-09-29T00:49:51+5:30
विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करण्यात आला.
विदर्भ राज्य आघाडीचे आंदोलन
वर्धा : विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करण्यात आला. हा करार १९६० मध्ये बहुमत नसताना पारित करून घेत विदर्भाला महाराष्ट्राशी जोडण्यात आले. शिवाय करारानुसार दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. यामुळे विदर्भ राज्य आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी नागपूर कराराची होळी करीत निदर्शने केली.
विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर सातत्याने अन्यय करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्राने निधी लाटून विदर्भाची गोची केली. परिणामी, विदर्भातील शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. आता हा अन्याय आणखी सहन केला जाणार नाही, अशी भूमिका विदर्भ राज्य आघाडीने घेतली आहे. वेगळे विदर्भ राज्य देण्याच्या मागणीसाठी बुधवारी नागपूर कराराची होळी करण्यात आली. विदर्भातील जनताही नागपूर कराराचा निषेध करीत असल्याचे याप्रसंगी जाहीर करण्यात आले. आंदोलनात आघाडीचे अध्यक्ष अमोल कठाणे, उपाध्यक्ष अनिकेत धेन्गेकर, महासचिव वैभव लोणकर, संघटक आशिष इझनकर, वि.रा. विद्यार्थी आघाडी अध्यक्ष स्वप्निल मुजबैले, उपाध्यक्ष चेतन वसाके, विदर्भवादी युवा संघटन आशिष सोनटक्के, आकाश उरकुडे, अक्षय बाळसराफ, अक्षय इंगळे, नेहाल वसू, निखील अंबूलकर, सौरभ माकोडे आदींनी सहभाग घेतला.(कार्यालय प्रतिनिधी)