हुतात्मादिनी पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली परेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:07 PM2017-10-21T23:07:19+5:302017-10-21T23:07:29+5:30
पोलीस मुख्यालय येथे हुतात्मादिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने सकाळी ७.४५ ते ९.१५ वाजताच्या दरम्यान पोलीस मुख्यालय येथे हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोलीस मुख्यालय येथे हुतात्मादिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने सकाळी ७.४५ ते ९.१५ वाजताच्या दरम्यान पोलीस मुख्यालय येथे हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी परेडचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील २५ पोलीस अधिकारी व १४५ पोलीस कर्मचारी तसेच जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. राखीव पोलीस निरीक्षक उईके यांनी शोक परेडचे संचालन केले. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.
२१ आॅक्टोबर १९५९ ला लदाख हद्दीतील भारत तिबेट सिमेवर बसलेल्या हॉट स्प्रिंग येथे सोळा हजार फूट उंचीवर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १० पोलीस शिपायांची तुकडी गस्त घालीत असताना अकस्मात त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लाची चाहूल लागताच मातृभूमीच्या रक्षणार्थ अपूरे मनुष्यबळ व अपूरे शस्त्रास्त्र यांची पर्वा न करता १० पोलीस जवान प्राणपणाने लढले. मातृभूमीच्या रक्षणार्थ या शुरवीरांनी मोठ्या संख्येने असणाºया शत्रुंशी लढा देत आपल्या प्राणांची आहूती दिली. तब्बल २१ दिवसानंतर १३ नोव्हेंबर १९५९ ला चिनने या वीर पोलीस जवानांचे मृतदेह भारताच्या स्वाधीन केले. तेव्हा सारा देश हळहळला होता. आमच्या सुखकर भविष्यकाळासाठी या १० शिलेदारांनी त्यांचा जागृत वर्तमान समर्पित केला. त्या हॉटस्प्रिंगच्या वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी देशभरात हा दिवस हुतात्मादिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी समस्त भारतात ज्या पोलीस दलातील जवानांनी आपले कर्तव्य पार पाडतांना हुतात्म पत्करले अशा सर्व वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना देशातील पोलीस दल मानवंदना देवून श्रद्धांजली अर्पण करीत असतो. १ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१७ दरम्यानच्या काळात ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा एकूण ३७९ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश असून महाराष्ट्रातील एक कर्मचाºयाचा समावेश आहे. त्यांना पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी मानवंदना अर्पण केली.
पोलीस मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रमात वीर शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी सुरूवातीला मानवंदना अर्पण केली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले यांनीही आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनीही मानवंदना देवून स्मारकावर पुष्पगुच्छ अर्पण केले. शोक परेडच्या वेळी शहीदांच्या नावाचे वाचन पोलीस निरीक्षक पराग पोटे व पोलीस उपनिरीक्षक अचल मलकापुरे यांनी केले. संचालन मोहंडळे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.