घरपोच गॅस सिलिंडरसाठी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:00 AM2018-09-26T00:00:23+5:302018-09-26T00:01:19+5:30

देवळी येथील तहसील कार्यालयात मंगळवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात संतप्त गॅस सिलिंडर धारकांनी घरपोच गॅस सिलिंडर देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले.

Home stamps for gas cylinders | घरपोच गॅस सिलिंडरसाठी ठिय्या

घरपोच गॅस सिलिंडरसाठी ठिय्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी येथील तहसील कार्यालयात मंगळवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात संतप्त गॅस सिलिंडर धारकांनी घरपोच गॅस सिलिंडर देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.
देवळी येथे एकमेव अधिकृत गॅस सिलिंडर एजन्सी आहे; पण या एजन्सी धारकाकडून ग्राहकांना वेळीच व घरपोच गॅस सिलिंड दिले जात नाही. सण व उत्सवादरम्यान नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. शिवाय सदर गॅस एजन्सीधारक ग्राहकांकडून अ‍ॅडवान्स पैसे घेऊन त्यांना सुमारे आठ ते दहा दिवस उशीराने गॅस सिलिंडर दिले जात आहे. यापूर्वी संबंधितांना निवेदन सादर करण्यात आले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त गॅस सिलिंडरधारकांनी मंगळवारी तहसील कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार देशमुख यांना सादर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, देवळी तालुका अध्यक्ष स्वप्नील कामळी यांनी केले. आंदोलनात पवन आव्हाळ, सलमान शेख, शुभम राठोड, मिरान पटेल, प्रतीक घोडे, शेखर इंगोले, प्रज्वल ढभारे, सुरज दुरघुडे, शुभम मातकर, वैभव वाघ, सुरज डुकरे, वैभव भोयर, कामळी आदी सहभागी झाले होते.

Web Title: Home stamps for gas cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.