होमगार्डच्या समस्या शासन सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:27 PM2019-08-30T23:27:55+5:302019-08-30T23:29:23+5:30

होमगार्ड महासमादेशक यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर होमगार्ड्सच्या समस्यांच्या निवारणासाठी संमेलन आयोजित होते. याप्रसंगी होमगार्ड मुख्यालय व शासनाद्वारे होमगार्डस्च्या समस्यांवर धोरणात्मक उपाय, सुविधा तरतुदी व कार्यामध्ये गतिमानता यावी या हेतूने संपूर्ण माहिती कार्यरत होमगार्डस्ना देण्यात आली.

Homeguards will solve problems | होमगार्डच्या समस्या शासन सोडविणार

होमगार्डच्या समस्या शासन सोडविणार

googlenewsNext
ठळक मुद्देनीलेश मोरे : जिल्हास्तरीय होमगार्ड संवाद संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सण-उत्सवात सेवा देणाऱ्या होमगार्डस्च्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे मत अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांनी व्यक्त केले.
होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यातील मानसेवी होमगार्ड अधिकारी व होमगार्ड्स यांचे तिमाही संवाद संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
होमगार्ड महासमादेशक यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर होमगार्ड्सच्या समस्यांच्या निवारणासाठी संमेलन आयोजित होते. याप्रसंगी होमगार्ड मुख्यालय व शासनाद्वारे होमगार्डस्च्या समस्यांवर धोरणात्मक उपाय, सुविधा तरतुदी व कार्यामध्ये गतिमानता यावी या हेतूने संपूर्ण माहिती कार्यरत होमगार्डस्ना देण्यात आली. मुख्यालयाने निर्धारित केलेले कर्तव्य, जबाबदारी, संगणकीय प्रणालीमुळे कामकाजातील पारदर्शकता व गतिमानता आणण्याचे दृष्टीने आवश्यक सूचना व माहिती जिल्हा समादेशकांनी दिली. आगामी काळातील कायदा व सुव्यवस्था बंदोबस्ताबाबत, होमगार्डसचे कार्य व अभिलेख पोलीस ठाणीनिहाय ऑनलाईन पद्धतीने जिल्हा कार्यालयस्तरावर करण्यात आल्या. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना योग्य ते निर्देश देण्यात येतील. तसेच येणाऱ्या दैनंदिन बंदोबस्ताबाबत उपस्थित होमगार्डना मार्गदर्शन व आवश्यक सूचना जिल्हा समादेशकांनी दिल्या. संमेलनास प्रशिक्षण केंद्राचे केंद्रनायक शेख, प्रशासकीय अधिकारी येवतकर, निदेशक राम पिंजरकर, जवादे, गुरनुले, भलमे, सूर्यवंशी, यादव, पातुरकर व सर्व कार्यालयीन कर्मचारी व संपूर्ण जिल्हा पथकातील समादेशक अधिकारी रोकडे, थेरे, कांबळे व महिला, पुरुष असे एकूण ६१३ होमगार्ड्स सैनिकांचा या संवाद संमेलनात सहभाग होता.

Web Title: Homeguards will solve problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस