अखंड सूत्रयज्ञाने राष्ट्रपित्याला आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:32 PM2018-01-30T23:32:49+5:302018-01-30T23:33:20+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना ७० व्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी अखंड सुत्रयज्ञाने आदरांजली अर्पण करण्यात आली. पहाटे ४.४५ वाजता घंटाघर ते बापू कुटी अशी रामधून प्रभात फेरी काढण्यात आली.

Honorable President, Honorable President | अखंड सूत्रयज्ञाने राष्ट्रपित्याला आदरांजली

अखंड सूत्रयज्ञाने राष्ट्रपित्याला आदरांजली

Next
ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमात विविध कार्यक्रम : १२ तासात ३१ हजार मिटर सुतकताई; सामूहिक प्रार्थना आणि रामधून

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना ७० व्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी अखंड सुत्रयज्ञाने आदरांजली अर्पण करण्यात आली. पहाटे ४.४५ वाजता घंटाघर ते बापू कुटी अशी रामधून प्रभात फेरी काढण्यात आली. बापूकुटी परिसरात सर्वधर्म प्रार्थना झाल्यानंतर सकाळी ६ वाजता अखंड सूत्रयज्ञाला प्रारंभ झाला.
सकाळी सुरू झालेल्या सुतकताईचा शेवट सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला. या १२ तासात येथे एकूण ३१ हजार मिटर सुतकताई झाल्याची माहिती आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आली.
कार्यकर्ता आणि दक्षिणायनचे सहकारी यांनी आश्रम परिसरात श्रमदान केले. सायंकाळी ५.३० ते ६ पर्यंत प्रार्थनाभूमीवर सामूहिक सुत्रयज्ञ झाल्यानंतर दैनिक सायंप्रार्थना झाली. बापू कुटी परिसरात सर्वधर्म भजने झाली. यात आश्रम, नई तालीम समिती, सर्व सेवा संघ, वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळ, दक्षिणायन आदि ठिकाणचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजप आ. आशिष देशमुख यांनी भेट देवून बापुकुटीत प्रार्थना केली. सकाळला कुसुम पांडे, शिवचरण ठाकूर, नामदेव ढोले, शोभा कवाडकर यांनी सुतकताईला प्रारंभ केला.
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांची उपस्थिती
महात्मा गांधी यांच्या ७० व्या पुण्यतिथी दिनी त्यांचे नातू राजमोहन गांधी यांची विशेष उपस्थिती आकर्षणाचे कारण ठरले. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती येथे येणाऱ्यांकरिता आकर्षणाचे केंद्र ठरले. येथे आयोजित समास २०१८ या कार्यक्रमानिमित्त हे दोघे येणार असल्याची माहिती नागरिकांना मिळताच येथे नागरिकांची चांगलीच उपस्थिती होती. शिवाय या कार्यक्रमादरम्यान या दोघांची झालेली भाषणे सर्वांनी ऐकली. दोघांनीही येथील यात्री निवासात सध्या असलेल्या प्रश्नांवर चर्चा केल्याची माहिती आभम प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आली.

Web Title: Honorable President, Honorable President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.