मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्ष सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:56 PM2018-07-16T22:56:02+5:302018-07-16T22:56:18+5:30
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ मध्ये वर्धा नगर परिषदेने देशात ५० वा तर राज्यात नऊवे स्थान पटकाविले आहे. याच कार्याची दखल घेवून नगराध्यक्ष अतुल तराळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे गौरव करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ मध्ये वर्धा नगर परिषदेने देशात ५० वा तर राज्यात नऊवे स्थान पटकाविले आहे. याच कार्याची दखल घेवून नगराध्यक्ष अतुल तराळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे गौरव करण्यात आला.
व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, भाजप प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणीक, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर आदींची उपस्थिती होती. वर्धा नगर पालिकेने अतुल तराळे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवून शहराला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला. शहरात तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर नम्मा शौचालय योजना राबविण्यालाही सुरुवात करण्यात आली. स्वच्छता कार्यक्रमाच्या दृष्टीकोणातून घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होतो, अशा जागांवर लक्ष केंद्रीत करून तेथे कचरा व्यवस्थापनाचे काम व्यवस्थीतपणे करण्यात आली. या सर्व कार्यपद्धतीमुळे वर्धा शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशात ५० व्या तर राज्यात नऊव्या स्थानी राहिल्याचे यावेळी सांगण्यात आले.