शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:15 PM2017-08-28T22:15:05+5:302017-08-28T22:15:30+5:30

यावर्षी पावसाच्या कमी पडण्यामुळे पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.

Horseshoe farmers | शेतकरी हवालदिल

शेतकरी हवालदिल

Next
ठळक मुद्देकपाशीवर बोंडअळी : फवारणीही निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : यावर्षी पावसाच्या कमी पडण्यामुळे पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. नियोजन गडबडल्यामुळे हिरव्याकंच दिसणाºया कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला आहे. शेतकºयांनी फवारणी करूनही अळी कमी झाली नाही. त्यामुळे ऐन हंगामात शेतकºयांसमोर संकट उभे ठाकले आहे. कृषी विभागाने औषध पुरविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
आष्टी, अंतोरा, लहानआर्वी, साहूर, भारसवाडा, तळेगावसह गावागावातील शेतकरी कृषी विभागाकडे घिरट्या घालत आहेत. कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रकाचा दौरा कृषी अधिकाºयांनी अद्यापही केला नाही. कपाशीवर गुलाबी बोंडअळी जास्त प्रमाणात दिसत आहे. कपाशीचे पीक पात्या फुलावर व बोंडावर आहे. त्यामुळे या अळीने पकड निर्माण केली आहे.
आष्टी तालुक्यात फार कमी पाऊस पडला आहे. नदी नाल्यांना पाणी नाही. तलावात अवघा ३८ टक्के पाणीसाठी आहे. सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
आष्टी तालुक्यात १ हजार हेक्टर वर कपाशी पिकांना अळीने घेरले आहे. कृषी विभागाने गावागावात कृषी मार्गदर्शन मेळावे घेवून शेतकºयांवरील संकट कर करण्याची मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक वर्धा, कृषीमंत्री यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनावर अनिकेत भडके नरसापूर, स्वप्नील महल्ले यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत. याप्रकरणी तालुका कृषी अधिकाºयांशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनीवर प्रतिसाद मिळाला नाही.
कर्जाच्या संकटात बोंडअळीची भर
बोंडामध्ये अळी शिरली की पूर्ण बोंड खराब होते. पाहिजे तसा कापूस त्यामधून निघत नाही. कापसाचा दर्जाही घसरतो. शिवाय सरकी किडक बनतात. रूईला मागणी करताना किंमत मिळत नाही. सरकीच्या तेलाचे प्रमाण फार कमी होते. याशिवाय निर्माण तयार होणाºया बियाण्याची उगवण क्षमता कमी झाल्याने उत्पन्नात फटका बसते. शेतकºयांना याची चिंता लागल्यामुळे यावर्षी उत्पन्न कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी आधीच कर्जापायी चिंतातूर आहे. त्यात नवीन संकट उभे ठाकले आहे.

ममदापूर, आष्टी, मलकापूर तलावाची अवस्था पाण्यावाचून बिकट झाली आहे. अप्पर वर्धा धरणाचे एकही दार उघडले नाही. एवढी भीषण समस्या आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी पद गत दोन महिन्यांपासून रिक्त आहे. वरिष्ठ अधिकाºयांचा तालुक्यावर वचक दिसत नाही.

Web Title: Horseshoe farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.