खासगी डॉक्टरांनी बंद ठेवली रुग्णालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:56 PM2019-06-17T22:56:17+5:302019-06-17T22:56:33+5:30
कोलकाता येथे कर्तव्यावर असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. याच घटनेच्या निषेधार्थ आयएमएच्यावतीने सोमवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी डॉक्टरांनी आपली खासगी रुग्णालये बंद ठेवली होती. शिवाय काहींनी लॅबही बंद ठेवली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोलकाता येथे कर्तव्यावर असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. याच घटनेच्या निषेधार्थ आयएमएच्यावतीने सोमवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी डॉक्टरांनी आपली खासगी रुग्णालये बंद ठेवली होती. शिवाय काहींनी लॅबही बंद ठेवली होती.
सदर आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. डॉक्टर किंवा आरोग्य विभागातील कुठल्याही व्यक्तीस आॅनड्युटी मारहाण करण्याच्या व्यक्ती विरोधात कडक कार्यवाही करावी. डॉक्टर व इतर कर्मचारी यांची सुरक्षा वाढवावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय मोगरे, सचिव डॉ. विपीन राऊत, उपाध्यक्ष डॉ. जयंत मकरंदे, डॉ. सचिन पावडे, डॉ. राजेश सरोदे, डॉ. विवेक चकोले, डॉ. ए. बी. जैन, डॉ. अरूण जैन, डॉ. उज्ज्वला मोगरे, डॉ. मोना सुने, डॉ. शुभदा जाजू, डॉ. दर्शना तोटे, सचिन तोटे, डॉ. अंजली पुजारी, डॉ. दीपा ढगे, डॉ. विकास ढगे, डॉ. तेजश्री सरोदे, डॉ. स्मीता पावडे, डॉ. प्रिया ठाकरे, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. शिल्पा राऊत, डॉ. वैशाली चव्हाण, शंतनू चव्हाण, डॉ. नहुन घाटे, डॉ. शिरीष वैद्य, डॉ. धामट, डॉ. पुनसे, डॉ. अकुज वर्मा, डॉ. अवनिश वर्मा, डॉ. शर्मा, डॉ. अदलखिया, डॉ. माहेश्वरी, डॉ. सचिन अग्रवाल, डॉ. अनुप केडीया, डॉ. सतीश हरणे, डॉ. सारंग गोडे, डॉ. महाजन, डॉ. तकीरवार, डॉ. लोहीया, डॉ. सुने, डॉ. साहु तसेच इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. आसमवार, डॉ पाटनी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.