वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या ?

By admin | Published: September 7, 2015 02:02 AM2015-09-07T02:02:39+5:302015-09-07T02:02:39+5:30

येथील शासकीय मागासवर्र्गीय मुलींच्या वसतिगृहातून गुरुवारी (३ सप्टेंबर) पासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय पूजा विघ्ने हिचा मृतदेह अप्पर वर्धा धरणात शुक्रवारी आढळून आला.

Hostel hostage suicides? | वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या ?

वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या ?

Next

धरणात सापडला मृतदेह : वसतिगृहातून बेपत्ता होती
आष्टी (शहीद) : येथील शासकीय मागासवर्र्गीय मुलींच्या वसतिगृहातून गुरुवारी (३ सप्टेंबर) पासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय पूजा विघ्ने हिचा मृतदेह अप्पर वर्धा धरणात शुक्रवारी आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. तिने धरणात आत्महत्या केली वा तिची हत्या करण्यात आली असा प्रश्न समोर येत आहे. पोलिसांच्या तपासातून सत्य पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पोलीस सूत्रानुसार, नरसापूर येथील पुजा विघ्ने ही हुतात्मा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. परिस्थिती हलाखीची असल्याने ती वसतिगृहात राहायची. गुरुवारी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला निघून गेली. त्यानंतर सायंकाळपर्र्यंत परतलीच नाही. वसतीगृह अधीक्षिका शोभा ठाकरे यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार आष्टी पोलिसात नोंदविली. यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या. अशातच शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता पूजाचा मृतदेह अप्पर वर्धा धरणात तरंगताना बेलोरा येथील पोलीस पाटील रमेश गडलींग यांना दिसला. त्यांनी याची माहिती आष्टी पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेनाकरिता पाठविला.
पूजा धरणावर गेली तेव्हा तिच्यासोबत आणखी एक मैत्रिण व दोन मित्र असल्याची माहिती आहे. पूजाचा चेहरा काळा पडला होता. जीभ बाहेर आली होती. डोके विचित्र अवस्थेत होते. यावरून तिची हत्या झाल्याची चर्चा सुरू आहे. ही घटना वरवर आत्महत्या वाटत असली तरी पूजाची हत्याच झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस घटनेचा तळाशी जाण्याचे काम करीत आहे. ठाणेदार श्याम सोनटक्के, सहायक पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे प्रकरणाचा तपास करीत आहे.(प्रतिनिधी)
वसतिगृह वाऱ्यावर
शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहामध्ये अनेक भोंगळ कारभार सुरू आहे. बाहेरील मुले मुलींच्या खोलीत येत असल्याची माहिती आहे. रात्री-बेरात्री असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थिनीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वसतीगृहाचे कर्मचारी आपल्याच कामात व्यस्त असतात. विद्यार्थीनी कुठे गेल्या, केव्हा आल्या याची नोंद होत नाही. मुख्य गेट उघडेच राहते. चौकीदार बेपत्ता असतो. अधीक्षिका सतत गैरहजर राहतात. याचा फायदा इतरांना होत आहे.
पोलीस तपासावर भिस्त
पोलिसांनी पूजा हरविल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर रात्रभर तपास केलाच नसल्याची माहिती आहे. आता तर तिचा मृतदेह मिळाला. लवकरच शवविच्छेदन अहवाल येईल. यात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा ठरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Hostel hostage suicides?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.