गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांची गांधी आश्रमला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 09:18 PM2018-08-16T21:18:23+5:302018-08-16T21:20:23+5:30
स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले आणि देशच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी स्वातंत्र्यदिनी भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले आणि देशच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी स्वातंत्र्यदिनी भेट दिली.
आश्रमात आगमन होताच अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू यांनी प्रकाश महेता यांचे सूतमाळेने स्वागत केले. आदी निवास,बा व बापू कुटी,बापू दप्तर याची माहिती जाणून घेतली.आश्रमाचा इतिहास व दैनिक कार्य समजावून घेतले. बापू कुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना व भजन झाले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आ.डॉ. पंकज भोयर,माजी खा.सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बुर्ले,नगरसेवक निलेश किटे,आश्रमचे अधीक्षक भावेश चव्हाण, डॉ. शिवचरण ठाकूर, मिथून हरडे,सुधाकर झाडे मार्गदर्शिका संगीता चव्हाण, अश्विनी बघेल,सुचित्रा झाडे आदीसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. महेता यांना आश्रमची माहिती यावेळी दिली.
वडिलांची आठवण
बापूंच्या आश्रमात येण्याची इच्छा स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर पूर्ण झाली.बापूंचे जीवन दर्शन व विचार विश्वात्मक मंत्र आहे.माझे मोठे वडील लाभशंकर महेता बापूंचे अनुयायी होते.मिठाच्या सत्याग्रहासाठी घरद्वार सोडले. स्वातंत्र्य संग्रामातील ते शिपाई होते.बापूंच्या विचार व कार्याप्रमाने जीवनव्यापन केले.युवकांनी आश्रमात आले पाहिजे. यातून राष्ट्र आणि राष्ट्रपित्याच्या जीवनाला समजून घेता येईल. मला मनापासून आनंद होतो की आश्रमात येण्याची संधी मिळाली.