‘यशाची गुरूकिल्ली’ सेमिनारला प्रचंड प्रतिसाद
By admin | Published: January 1, 2017 02:08 AM2017-01-01T02:08:45+5:302017-01-01T02:08:45+5:30
लोकमत आणि विद्यांलकार प्रस्तुत मॅथ अॅण्ड सायन्स आॅलम्पियाड या परीक्षेचा बक्षीस समारंभ तसेच यशाची गुरूकिल्ली
वर्धा : लोकमत आणि विद्यांलकार प्रस्तुत मॅथ अॅण्ड सायन्स आॅलम्पियाड या परीक्षेचा बक्षीस समारंभ तसेच यशाची गुरूकिल्ली या विषयावर अनेकांत स्वाध्याय मंदिर या हॉलमध्ये आयोजित सेमिनारला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ११ वी, १२ वी सायन्समधून करिअर करताना, विद्यालंकारचे योगीकरण, ५५ वर्षांचा अनुभव आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगला निकाल विद्यालंकारचाच, या संदर्भात टिप्स आणि ट्रिक्स अगदी सहजतेने कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीरंग वैरागडे, प्रणव घुसे, डॉ. शेषराव बावणकर, संदीप पाटील यांची उपस्थिती होती.
विद्यार्थी आणि पालकांनी भरगच्च भरलेल्या सभागृहात प्रा. संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना बिजगणित, भूमिती व सायन्स झटपट कशी सोडवावी, उरलेल्या मोजक्या दिवसांत १० वीचा अभ्यास कसा करावा?, दहावीचे पेपर कसे लिहावे? आदी विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर मॅथ अॅण्ड सायन्स आॅलम्पियाड या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले, त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मॅथ अॅण्ड सायन्स आॅलम्पियाड या परीक्षेमध्ये लोकविद्यालय वर्धा, न्यू इंग्लिश हायस्कूल वर्धा, अग्रगामी हायस्कूल वर्धा, महर्षी विद्या निकेतन वर्धा, सुशील हिम्मतसिंगका वर्धा, सरस्वती विद्या मंदिर वर्धा, रत्नीबाई हायस्कूल वर्धा, भरत ज्ञान मंदिर वर्धा या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
समृद्धी मस्रे, साहील बोरकर, ऐश्वर्या दादुरवाडे, प्रांजली अरुण गव्हाळे, जय पाटणकर, अनुराग माटेकर, भावेश पुरोहित, अभिषेक तिवारी, मीताली वंजारी हे विद्यार्थी जिल्हास्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले. ११ वी, १२ वी सायन्सच्या अॅडमिशनसाठी विद्यालंकार वर्धा ७३८७६७६९१० येथे संपर्क साधावा. उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन मनीषा भेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शस्वीतेकरिता प्रियंका मोहोड यांनी सहकार्य केले.(उपक्रम प्रतिनिधी)