विखुरलेल्या अवस्थेत आढळले मानवी सांगड्याचे अवयव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 16:40 IST2021-11-14T15:26:30+5:302021-11-14T16:40:08+5:30
सोमलगड शिवारात असलेल्या वनखंड क्रमांक २५५ मध्ये सीमेलगत अचानक दुर्गंधी आली. वनमजुरांसह वनरक्षकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे एका अज्ञात व्यक्तीच्या सांगाड्याचे अवयव विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले.

विखुरलेल्या अवस्थेत आढळले मानवी सांगड्याचे अवयव
वर्धा : सेलडोह बीटमध्ये पायदळ गस्तीदरम्यान दुर्गंधी आल्याने पाहणी केली असता, एका अज्ञात व्यक्तीच्या सांगाड्याचे अवयव परिसरात विखुरलेल्या अवस्थेत दिसून आले. याप्रकरणी वनरक्षक नीशा पुरुषोत्तम चौधरी यांनी सिंदी रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
वनरक्षक नीशा चौधरी ही कर्मचाऱ्यांसह वनपरिक्षेत्र हिंगणी सहवन क्षेत्र केळझरअंतर्गत सेलडोह बीटमध्ये पायदळ गस्त घालत असताना सोमलगड शिवारात असलेल्या वनखंड क्रमांक २५५ मध्ये सीमेलगत अचानक दुर्गंधी आली. वनमजुरांसह वनरक्षकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे एका अज्ञात व्यक्तीच्या सांगाड्याचे अवयव विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच सांगाड्याच्या अवयवांजवळ एक ब्लॅंकेट, काही कपडे, दुपट्टा, प्लास्टिक डब्बा, गुलेर, अंगारडब्बी असे साहित्यही मिळून आले. याप्रकरणी नीशा चौधरी यांनी तत्काळ सिंदी रेल्वे पोलिसात तक्रार दिली असून पुढील तपास सिंदी पोलीस करीत आहेत.