घर करावरील अतिरिक्त दंडाविरोधात धरणे

By admin | Published: March 9, 2016 03:09 AM2016-03-09T03:09:14+5:302016-03-09T03:09:14+5:30

नगरपालिकेद्वारे घर कर थकीत असलेल्या थकबाकीदारावर महिन्याला २ टक्के अतिरिक्त दंड आकारणे सुरू केले आहे.

Hurdle against extra tax on home taxes | घर करावरील अतिरिक्त दंडाविरोधात धरणे

घर करावरील अतिरिक्त दंडाविरोधात धरणे

Next

नगर पालिकेसमोर आम आदमी पार्टीचे आंदोलन
वर्धा : नगरपालिकेद्वारे घर कर थकीत असलेल्या थकबाकीदारावर महिन्याला २ टक्के अतिरिक्त दंड आकारणे सुरू केले आहे. परिणामी थकबाकी असलेल्या नागरिकांना वर्षाला २४ टक्के चक्रवाढ व्याजासहित देयक भरावयाचे आहे. हा दंड आकारणे बंद करून अन्याय दूर कारावा या मागणीसाठी वर्धा न. प. समोर आम आदमी पार्टीच्य वतीने धरणे देण्यात आले.
या दंड आकारणीसोबतच पालिकेद्वारे बळजबरीने मालमत्ता जप्ती सुरू करण्यात आली आहे. नळ कनेक्शनही कापले जात आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांना मुलभूत गरजापासून वंचित करू नये. याबाबतचे निवेदनही वर्धा न. प. मुख्याधिकारी यांना पुन्हा देण्यात आले. थकबाकीदारांवर लावण्यात आलेला अतिरिक्त दंड हा सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही. हा कर मालमत्ता करावर आकारणे गरजेचे होते. पण तसे न करता पालिकेने तो एकूण बिलावर आकारणे सुरू केले आहे.
पालिकेने आकारलेला हा अतिरिक्त दंड मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या धरणे आंदोलनात आम आदमी पक्षाचे प्रमोद भोमले, प्रमोद भोयर, रवींद्र साहु, तुळसीदास वाघमारे, रवी बाराहाते, प्रमोद हजारे, नितीन झाडे, मयूर डफरे, अरूण महाबुधे, मधुकर बेंडे, मंगेश शेंडे, मयुर राऊत, नामदेव खुर्गे, रवी बाराहाते आदी सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Hurdle against extra tax on home taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.