महामार्गाच्या निर्र्मितीमुळे गावांची ओळख हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:00 AM2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : रस्ते हे विकासाचे महत्वाचे घटक आहेत. सध्या केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गांचे काम ...

The identity of the villages was lost due to the inaction of the highway | महामार्गाच्या निर्र्मितीमुळे गावांची ओळख हरवली

महामार्गाच्या निर्र्मितीमुळे गावांची ओळख हरवली

Next
ठळक मुद्देखडकी, सेलू, केळझर, पवनारसह देवळीबाहेरूनच जातात वाहने

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रस्ते हे विकासाचे महत्वाचे घटक आहेत. सध्या केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गांचे काम राज्याच्या विविध भागात सुरू आहे. बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्धा जिल्ह्यात पूर्ण झाल्याने या रस्त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांची ओळख आता पुसली गेली आहे.
नागपूरवरून यवतमाळकडे निघालेल्या वाहनाला आता खडकी, सेलू, केळझर, सेलडोह, देवळी या गावांचे दर्शनही होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी नागपूर-वर्धा हा डांबरी रस्ता दुहेरी स्वरूपाचा होता. परंतु, मागील एक वर्षापासून या रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी चौपदरी रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता तयार करताना जुन्या रस्त्याच्या काठावरील दोन्ही भागातील जमीन मोठ्या प्रमाणावर संपादित करण्यात आली.
या रस्त्याबरोबरच समृद्धी महामार्गाचे कामही सुरू करण्यात आले. त्याची गती सद्यस्थितीत मंदावलेली आहे.
तुळजापूर-बोरी महामार्गामुळे खडकीचे हनुमान मंदिर आता वाहनचालकाच्या लक्षातच येत नाही. पूर्वी येथे नागरिक दर्शनासाठी थांबायचे. मात्र, आता वाहनाचा वेग जुन्यापेक्षा वाढल्याने खडकी कधी गेले, याचा पत्ताच लागत नाही, अशी प्रतिक्रिया अनेक वाहनचालकांची आहे.
पवनार, सेलू, केळझर या गावाच्या बाहेरूनच वाहने निघून जात आहेत. सेलू गावातही आता जाण्याची गरज उरलेली नाही. महामार्गावरून सेलू व मदनीसाठीचा मार्ग फलक दिसून येतो. केळझर गावातील वर्दळही कमी झाली आहे. त्यामुळे गावांची ओळख या महामार्गामुळे संपली, असेच म्हणावे लागेल.

दिवाळीनिमित्त नागपूरवरून वर्ध्याला येत असताना खडकी केव्हा आले, हे लक्षातच आले नाही. पूर्वी येथे दर्शन व नाश्त्यासाठी थांबता येत होते. परंतु, यावेळी आम्ही सेलूजवळ आलो. तेव्हा खडकी मागे गेले, हे लक्षात आले. नव्या रस्त्यामुळे खडकी व बरीच गावे लक्षातच येत नाहीत. सेलूबाहेरूनच आम्ही वाहन आणले. त्यामुळे सेलूचा केवळ फलक दिसला.
- प्रफुल्ल चाफले, रहिवासी, खारघर,नवी मुंबई

Web Title: The identity of the villages was lost due to the inaction of the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.