नाव एकाचे तर छायाचित्र दुसऱ्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:28 PM2018-10-22T23:28:32+5:302018-10-22T23:28:48+5:30
निवडणूक आयोगाकडून मतदारांचे ओळखपत्र बनविण्याचे काम सुरु असून त्यातील सावळागोंधळ अद्यापही कायम आहे. नुकताच मिळालेल्या ओळखपत्रावर नाव एकाचे आणि छायाचित्र दुसऱ्याचे दिसून आल्याने या ओळखपत्राच्या आधारे मतदानाचा अधिकार तरी कसा बजावावा? असा प्रश्न पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निवडणूक आयोगाकडून मतदारांचे ओळखपत्र बनविण्याचे काम सुरु असून त्यातील सावळागोंधळ अद्यापही कायम आहे. नुकताच मिळालेल्या ओळखपत्रावर नाव एकाचे आणि छायाचित्र दुसऱ्याचे दिसून आल्याने या ओळखपत्राच्या आधारे मतदानाचा अधिकार तरी कसा बजावावा? असा प्रश्न पडला आहे.
मतदानाचा अधिकार बजावण्यासह विविध कामांत ओळखपत्र म्हणून कामी येणाऱ्या मतदान ओळखपत्रात त्रृटी राहत असल्याचे वारंवार पुढे आले आहे. फॉर्म न भरताच वडील आणि मुलाला प्राप्त झालेल्या मतदान ओळखपत्रात सर्व माहिती बरोबर असली तरी छायाचित्र दुसऱ्याच व्यक्तींचे मुद्रीत आहे. गोपाळ नारीकर व संदीप नारीकर यांनी जुनी म्हाडा कॉलनी येथे झालेल्या मतदार नोंदणी शिबिरात सहभाग घेतला नव्हता. तरीही त्यांच्या नावे मतदान ओळखपत्र तयार करण्यात आले. नोंदणी न करता त्यांच्या नावाचे ओळखपत्र तयार कसे झाले, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. ओळखपत्रातील चुकीमुळे हे ओळखपत्र निरूपयोगी ठरले आहे. जुनी म्हाडा कॉलनी येथील रहिवासी गोपाळ वामन नारीकर आणि त्यांचा मुलगा संदीप गोपाळ नारीकर यांना मागील आठवड्यात हे ओळखपत्र मिळाले. या ओळखपत्रात नावासह पत्ताही बरोबर आहे. मात्र, या छायचित्र दुसºयाच व्यक्तींचे मुद्रीत केले आहे. छायाचित्र दुसºया व्यक्तीचे असल्यामुळे या ओळखपत्रात बदल करण्याकरिता आता नारीकर पिता-पुत्राला मनस्ताप सहन करावा लागत आहे.