सरपंच सक्षम असल्यास गावाचा विकास निश्चित होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:02 AM2019-01-28T00:02:35+5:302019-01-28T00:03:15+5:30

गावाचा विकास करणे ग्रामसेवकासह सरपंचांच्या हातात आहे. सरपंच हा गाव विकासाचा मुख्य घटक असून ज्या गावचा सरपंच सक्षम, त्या गावाचा विकास उत्तम होतो. सरकारच्या अनेक योजनांचा निधी आता थेट ग्रामपंचायतस्तरावर मिळत असल्याने सरपंचांना मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले आहेत.

If the Sarpanch is competent, the development of the village is fixed | सरपंच सक्षम असल्यास गावाचा विकास निश्चित होतो

सरपंच सक्षम असल्यास गावाचा विकास निश्चित होतो

googlenewsNext
ठळक मुद्देरामदास तडस : लोणी येथे सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : गावाचा विकास करणे ग्रामसेवकासह सरपंचांच्या हातात आहे. सरपंच हा गाव विकासाचा मुख्य घटक असून ज्या गावचा सरपंच सक्षम, त्या गावाचा विकास उत्तम होतो. सरकारच्या अनेक योजनांचा निधी आता थेट ग्रामपंचायतस्तरावर मिळत असल्याने सरपंचांना मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले आहेत. जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामपंचायतीचे महत्त्व वाढल्याने निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी सरपंचांनी नियोजन करावे. तसाच लोकसहभाग व सर्व सदस्यांना सोबत घेऊन सरपंचांनी आपल्या गावांचा कायापालट करावा, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.
लोणी येथे येथे खासदार स्थानिक विकास निधी २०१८-१९ अंतर्गत ८ लाख रुपयांतून विविध विकासकामे, जिल्हा परिषदेअंतर्गत १ कोटी रुपयांचे आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद १७ सामूहिक निधीअंतर्गत ४.५० लाखांची विकास कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २.७३ लक्ष किमतीचे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम खासदार तडस यांच्या हस्ते झाला.
यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी सरपंच साहेबराव ढोणे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, पंचायत समिती सभापती विद्या भुजाडे, जिल्हा परिषदेच्या सदस्य सुनीता राऊत, पंचायत समिती सदस्य युवराज खडतकर, दिलीप अग्रवाल, सुनील गफाट, दीपक फुलकरी, गजानन राऊत, दशरथ भुजाडे, अरविंद झाडे, चंद्र्रकांत ठाकरे, सरपंच सविता सपाट, उपसरपंच नरेश निकम, सरपंच गजानन हिवरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य यशोदा मेंढे, सदस्य उषा गजबे, माया तिरळे, कुसुम जगताप आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
खासदार तडस म्हणाले, कमी कालावधीत सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागलेत. सततच्या पाठपुराव्याने विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत, तसेच नितीन लोणकर यांनी गावातील तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य हित लक्षात घेऊन आरोग्य केंद्राकरिता १ एकर जागा दिली, ही अभिमानास्पद बाब आहे, असेही यावेळी म्हणाले.
यावेळी नितीन लोणकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच गावातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांचासुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सदस्य वैभव श्यामकुवर यांनी केले तर आभार सदस्य उमेश जंगले यांनी मानले. कार्यक्रमाला खेडकर, सुभाष लोणकर, किशोर लोणकर गोविंदा हांडे, मोनाली आडकिने, शंकर राऊत, हिंमत मेश्राम, वसंतराव लोणकर, पुंडलिक निमकर, हर्षल भोयर, प्रफुल्ल मेश्राम, सोनाली चहारे, आकाश कोल्हे, अजंली तिरळे, आरती तिरळे, हेमंत लांडगे, तुषार लोणकर, अतुल कानफाडे, नितीन सपाट, जगदीश पायघन, संजू ढोणे, अरुण पेटकर, विवेक ढोणे, कवडू भोयर, अनिल पारधी, प्रकाश भोयर, वैभव जंगले, विनोद भोयर, किशोर जाचक, संजय कवाडे, मंगलदीप गाडे, दिपक इंगोले, राज पवार, प्रतीक्षा बचत गटाच्या अध्यक्ष, सदस्य महिला, गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य व लोणी येथील ग्रामस्थ, परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: If the Sarpanch is competent, the development of the village is fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.