विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन केल्यास ते जीवनात ध्येय गाठू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:15 AM2018-02-13T00:15:13+5:302018-02-13T00:15:31+5:30

दलित, पीडित आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य शंकरराव सोनवणे यांनी केले.

If students make appropriate guidelines, they can reach their goals in life | विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन केल्यास ते जीवनात ध्येय गाठू शकतात

विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन केल्यास ते जीवनात ध्येय गाठू शकतात

googlenewsNext
ठळक मुद्देसी.एल. थूल : दलित मित्र शंकरराव सोनवणे जयंती महोत्सव

आॅनलाईन लोकमत
वर्धा : दलित, पीडित आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य शंकरराव सोनवणे यांनी केले. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौध्दीक विकास साधण्यासाठी आवश्यक वातावरण व साधणे उपलब्ध करून दिली तर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टी निर्माण होते. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली तर विद्यार्थी जीवनात ध्येय गाठू शकतो, असे प्रतिपादन अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थुल यांनी केले.
दलित मित्र व माजी मंत्री अ‍ॅड. शंकरराव सोनवणे यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक मेळावा आणि सत्कार समारंभ पार पडला. नवभारत अध्यापक विद्यालय, जगजीवनराम माध्यमिक विद्यालय तथा नवभारत अध्यापक अभ्यास शाळा येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
पुढे बोलताना थुल म्हणाले माझ्या जीवनाला आकार देणाºया आणि गॉड फादर म्हणून लाभलेले सोनवने यांनीच मला योग्यवेळी मार्गदर्शन केल्याने आज यशस्वी होता आले. मंचावर ठक्करबाप्पा सेवा समाज संस्थेचे अध्यक्ष अनिल सोनवणे, संस्था सचिव लक्ष्मीनारायण सोनवणे, जिल्हा बुध्दीबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप दाते, सचिव कोपुलवार, संस्था सहसचिव नयन सोनवणे, माजी मुख्याध्यापक मधुकर वानखेडे, धर्मपाल ताकसांडे, मारोतराव किटे, श्रीकांत देवळीकर यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.
क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांनी कला गुणांची चूनुक दाखविली. यानंतर मान्यवरांनी शंकरराव सोनवने यांच्या जीवन कार्याचा उल्लेख मनोगतातून केला. याप्रसंगी कर्तव्यदक्ष पालक म्हणून श्रीकांत देवळीकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्हॉलीबॉल प्रशिक्षक रमेश भगत, स्काऊट मास्टर जंगले, आदर्श विद्यार्थी ज्योत्स्ना बोरकर व मयुरी सावंकार यांचा सत्कार केला. यानंतर संचालन योगिता पुंड, सार्थक नरांगे, ज्योत्स्ना बोरकर यांनी केले. तर आभार रमेश निमसडकर यांनी मानले.

Web Title: If students make appropriate guidelines, they can reach their goals in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.