शेतीला जोड दिल्यास आर्थिक स्तर उंचावेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:35 PM2018-07-04T23:35:50+5:302018-07-04T23:36:31+5:30
सध्याच्या विज्ञान युगात शेतकऱ्यांनी नुसते शेतीच्या भरवशावर न राहता प्रत्येक शेतकºयांनी शेतीला शेळीपालन, दुग्धव्यवसाय आदींची जोड दिली पाहिजे. असे झाल्यास शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्याच्या विज्ञान युगात शेतकऱ्यांनी नुसते शेतीच्या भरवशावर न राहता प्रत्येक शेतकºयांनी शेतीला शेळीपालन, दुग्धव्यवसाय आदींची जोड दिली पाहिजे. असे झाल्यास शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
जि.पं.च्यावतीने तेथील सभागृहात कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, जि.प. मुख्य कार्य पालन अधिकारी अजय गुल्हाणे, कृषी व्यवसाय संघाचे रवी शेंडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक ईलमे, पं. स. सभापती महानंदा ताकसांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ. उंबरकर यांनी गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कोण कोणत्या उपाय योजना कराव्या याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मुकेश भिसे पारंपारिक शेती जशी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली करतो तशीच आधुनिक शेती ही शेतकऱ्यांनी अधिकारी व कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनात करावी, असे सांगितले.
जि.प. सदस्य तेलंग म्हणाले की, कमी खर्चाची शेती कशी करता येईल यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले. विद्या मानकर यांनी कपाशीवरील बोंडअळी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कृषी विकास अधिकारी धर्माधिकारी यांनी कामगंध सापळे (फेरोमॅन ट्रॅप) चा शेतात जास्तीत जास्त वापर करावा असे सांगितले. कार्यक्रमादरम्यान वर्धा तालुक्यातील चार व सेलू तालुक्यातील दोन प्रगतीशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कृषी अधिकारी संजय बमनोटे यांनी केले तर आभार कृषी विकास अधिकारी रवींद्र धर्माधिकारी यांनी मानले. जि.प.च्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला फुसाटे, धनवीज, तेलंग, सावरकर, डॉ. उंबरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांच्यासह मोठ्या संख्यने परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेकरिता जि.प.च्या कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.