ऑनलाइन शस्त्रखरेदी कराल, तर पोलीस कोठडीची हवा खाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 11:44 PM2022-09-29T23:44:14+5:302022-09-29T23:47:10+5:30

अनेकांनी चायनीज चाकूंचा वापर गुन्ह्यात केला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे असे आढळून आल्यास पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे. हे मात्र तितकेच खरे. शहरातील अनेक तरुण, युवक ‘भाईगिरी’च्या खुमखुमीत अडकले आहेत. वर्चस्ववादातून अनेक गंभीर घटना घडताना दिसून येत आहेत. त्यात वापरण्यात आलेले हत्यारं हे ऑनलाइन मागविण्यात आल्याचे पोलीस तपासात देखील उघडकीस आले आहे.

If you buy weapons online, then the air of police custody will eat! | ऑनलाइन शस्त्रखरेदी कराल, तर पोलीस कोठडीची हवा खाल!

ऑनलाइन शस्त्रखरेदी कराल, तर पोलीस कोठडीची हवा खाल!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हत्यारं बाळगे आणि बोलाविणे हा गुन्हा असला तरी अनेक तरुण विविध ऑनलाइन शॉपिंग साईट्सवरून बिनधास्तपणे शस्त्रखरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी चायनीज चाकूंचा वापर गुन्ह्यात केला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे असे आढळून आल्यास पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे. हे मात्र तितकेच खरे. शहरातील अनेक तरुण, युवक ‘भाईगिरी’च्या खुमखुमीत अडकले आहेत. वर्चस्ववादातून अनेक गंभीर घटना घडताना दिसून येत आहेत. त्यात वापरण्यात आलेले हत्यारं हे ऑनलाइन मागविण्यात आल्याचे पोलीस तपासात देखील उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलविभागाने ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर नजरा केंद्रित केल्या असून कारवाई करणार आहे.

ऑनलाइन शस्त्र खरेदी मोठे आव्हान
n सध्या तरुण ऑनलाइन शस्त्र खरेदीकडे वळले आहे. विनादिक्कत अगदी सहजरित्या शस्त्र घरपोच मिळत असल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावत चालले आहे. त्यामुळे ऑनलाइन शस्त्र विक्री रोखणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. 

ऑनलाइन खरेदी करून गुन्ह्यात वापर 
शहरासह जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांत चायनीज शस्त्रांचा वापर गुन्हेगारांनी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून कारवाई करण्याची गरज आहे.

शस्त्रखरेदी, विक्री, बाळगणे हा गुन्हा 
n शस्त्र खरेदी करणे, त्याची विक्री करणे किंवा स्वत:जवळ बाळगणे हे कायद्याने गुन्हा आहे. असे करताना कुणी आढळून आल्यास त्याच्यावर शस्त्र अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली जाते.

ऑनलाइन खरेदीवर पोलिसांचे लक्ष 
- विविध ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. सायबर सेलमधील कर्मचाऱ्यांकडून अशा साईट्सवर वॉच ठेवला जातो आहे. शस्त्र खरेदी करताना आढळून आल्यास कारवाईसह कोठडीची हवा खावी लागणार आहे. 

 

Web Title: If you buy weapons online, then the air of police custody will eat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.