एमबीबीएस मिळत नसतील तर बीएएमएस डॉक्टरांकडून सेवा पुरवा

By admin | Published: September 21, 2016 01:08 AM2016-09-21T01:08:47+5:302016-09-21T01:08:47+5:30

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी शासनाने नुकत्याच घेतलेल्या

If you do not get MBBS, then you can provide services from BAMS doctors | एमबीबीएस मिळत नसतील तर बीएएमएस डॉक्टरांकडून सेवा पुरवा

एमबीबीएस मिळत नसतील तर बीएएमएस डॉक्टरांकडून सेवा पुरवा

Next

उपजिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन : उपजिल्हा रुग्णालयात १८ डॉक्टरांची गरज
हिंगणघाट : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी शासनाने नुकत्याच घेतलेल्या एमबीबीएस पदव्युत्तर डॉक्टरांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यास बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करून नागरिकांना कायमस्वरूपी आरोग्य सेवा पुरविण्याची मागणी आपचे मनोज रूपारेल व कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांना निवेदन सोपवून शासनाला केली आहे.
राज्यातील आत्महत्याग्रस्त १० जिल्ह्यातील आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी ४१३ डॉक्टर परभरती साठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यात वर्धा जिल्ह्यातील २६ डॉक्टरांची निवड करून त्यांची माहिती वरिष्ठांकडे पाठविण्यात आली. याला महिन्याचा कालावधी होत असला तरी नियुक्तीचे आदेश देण्यात आले नाही. हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात १८ डॉक्टरांची गरज असताना केवळ चार डॉक्टरांचे सहकार्याने १०० खाटाचे रुग्णालय २४ तास सेवा देत आहे. येथे १००० ते १२०० रुग्ण तपासणी करीत आहे. या रुग्णालयातील पाच जागा कागदोपत्री रिक्त असून नऊ डॉक्टर विविध कारणांनी गैरहजर आहेत.
यापैकी चार डॉक्टर गत दोन वर्षांपासून उच्च शिक्षणासाठी गेले आहे. नऊ रिक्त जागावरील पद भरती अडचणीत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले आहे. अशा स्थितीत येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडली असून याकडे जिल्हा प्रशासनाने व शासनाने लक्ष देवून पदभरती करून कायम स्वरूपी तोडगा कारण्याची मागणी केली आहे. येत्या दहा दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन देताना आपचे मनोज रूपारेल, भाऊराव कोटकर, प्रमोद जुमडे, जगदीश शुक्ला, अखिल धाबर्डे, नरेंद्र चुंबळे, कमलाकर बोकडे, राजू अरगुळे, सलमान रंगरेज, बाबु गिरी, भाऊ जवादे, पलाश दुबावारे, विनोद कुंभारे, अमय पोहनकर, कपील थूल, भारत पवार, संजय हावगे, गजानन येन्नेवार, संदेश थूल, फहीम भाई, प्रफुल क्षिरसागर आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: If you do not get MBBS, then you can provide services from BAMS doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.