थकवा, चिडचिड वाढली असेल तर लगेच करा हिमोग्लोबिन तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:00 IST2025-01-22T16:58:51+5:302025-01-22T17:00:00+5:30

Vardha : ३५ हजार जणांनी केली तपासणी

If you feel tired or irritable, get your hemoglobin checked immediately. | थकवा, चिडचिड वाढली असेल तर लगेच करा हिमोग्लोबिन तपासणी

If you feel tired or irritable, get your hemoglobin checked immediately.

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
महिलांमध्ये साधारणपणे डी व्हिटॅमिन, कॅल्शियम, बी १२ आणि लोह, तसेच हिमोग्लोबिन यांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. लोह हे शरीरातले सर्वात महत्त्वाचे खनिज असते. शरीरात लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरता असेल, तर बऱ्याच समस्या भेडसावतात. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम दिसून येत असल्याने महिलांनी तातडीने रक्ताची तपासणी करावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


लोह आणि हिमोग्लोबिन हे घटक एकमेकांशी कनेक्टेड असल्याने दोघांचे शरीरातील प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. मात्र, हिमोग्लोबिन कमी असेल, तर आपल्याला आरोग्याशी निगडीत विविध समस्या उद्भवतात. संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करत असते. मात्र, ते न मिळाल्यास सततचा थकवा, चिडचिड, निस्तेजपणा, जीव घाबरल्यासारखे होणे अशा समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरात कमतरता आहे हे वेळीच लक्षात आले, तर त्यावर उपचार करणे सोपे होते. 


घाबरल्यासारखे होणे 
शरीरात लोह कमी असेल, तर हिमोग्लोबीनही कमी असण्याचीच शक्यता जास्त असते. अशावेळी हृदयाला श्वास घेण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतात. यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते आणि जीव घाबरल्यासारखे होते. हे लक्षण बराच वेळ जाणवत असेल आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केले, तर हृदयावर ताण येतो आणि कार्यात अडथळा निर्माण होतो.


श्वास कमी पडणे 
हिमोग्लोबिन कमी झाले की, शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम कमी होते. दम लागल्यासारखे किंवा श्वास कमी पडल्यासारखे व्हायला लागते. हे हिमोग्लोबिन कमी झाल्याचे लक्षण आहे, हे वेळीच ओळखायला हवे.


अनेकदा थकवा जास्त येणे 
अनेकदा तरुण मुलींना किंवा महिलांना सतत थकवा आल्यासारखे वाटते. काहीच न करता पडून राहावेसे वाटते. अशावेळी इतर कोणतीही लक्षणे नसल्याने काम टाळल्या जाते. मात्र, रक्तातील हिमोग्लोबिन आणि लोहाची पातळी कमी असल्यास बराच थकवा येण्याची शक्यता असते. त्यामुळे तपासणी करणे आवश्यक आहे.


त्वचा निस्तेज होणे अन् केस गळण्याची समस्या 
आपली त्वचा एकाएकी निस्तेज व्हायला लागते. तसेच, केसही मोठ्या प्रमाणात गळायला लागतात आणि पातळ होतात. अशावेळी त्वचा आणि केसांच्या समस्येने सौंदर्यात बाधा येत असल्याने आपण टेन्शनमध्ये येतो. पण, रक्तातील हिमोग्लोबिन, लोह कमी असते.


तपासणी दरम्यान रुग्णाच्या रक्तात नेमके काय आढळले?

  • अनेक महिला व पुरुषांच्या शरीरात लोह आणि हिमोहग्लोबीनची कमतरता आढळून आली.
  • यामुळे शरीरात शुगरचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. दरम्यान त्यांना शुगर कमी करण्यासाठी मोफत औषधोपचार सुरू केले आहे. 
  • सर्दी व खोकल्याचा त्रास असलेल्या संशयीत रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले असून, क्षयरोगाबाबतही तपासणी केली आहे.


३५ हजार जणांनी केली हिमोग्लोबीन तपासणी 
जिल्हा रुग्णालयात एप्रिल २०२४ ते आतापर्यंत ३५ हजार ५५२ जणांनी हिमोग्लोबीनची तपासणी केली. यात ७ एमजीपेक्षा कमी हिमोग्लोबीन असलेल्या १४८६ रुग्णांना मोफत औषधोपचार दिला जात आहे.
 

Web Title: If you feel tired or irritable, get your hemoglobin checked immediately.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.