सन्मानने जगायचे असेल तर संघटित व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:29 PM2018-05-02T23:29:36+5:302018-05-02T23:29:36+5:30
संविधानाने कामगारांना दिलेले अधिकार मिळाले तरच कामगार सुखी राहु शकतो. या विचारानेच कामाचे तास आठ तास, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय आरोग्य सुविधा महिलाकरिता पगारी प्रसूती किमान वेतन समान कामाला समान वेतन या सारख्या योजना लागू झाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संविधानाने कामगारांना दिलेले अधिकार मिळाले तरच कामगार सुखी राहु शकतो. या विचारानेच कामाचे तास आठ तास, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय आरोग्य सुविधा महिलाकरिता पगारी प्रसूती किमान वेतन समान कामाला समान वेतन या सारख्या योजना लागू झाल्या. परंतु कामगारांची भक्कम एकजुट नसल्यामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारापासून कामगार वंचित राहत आहेत, असे विचार औद्योगिक न्यायालय नागपूरचे सेवानिवृत्त न्यायाधीश भरत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
आयटक व विविध संघटनेच्यावतीने कामगार दिवस व डॉ. गोंविद पानसरे पुरस्कार २०१८ या कार्यक्रमात संविधानाने दिलेले कामगार कायदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे होते.
कामगार दिनी सकाळी प्रथम शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कामगारांचे प्रतीक लालझेंड्यांचे ध्वजारोहन ज्येष्ठ कामगार रामभाऊ दाभेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाहीर धम्मा खडसे व संजय भगत यांनी विविध गीत सादर करून फसव्या सरकाराची पोल खोल केली.
आयटक जिल्हा अध्यक्ष मनोहर पचारे, जिल्हा सचिव वंदना कोळणकर, अंगणवाडी कर्मचारी युनियन जिल्हा अध्यक्ष विजया पावडे, कामगार संघटना सयुंक्त कृती समितीचे गुणवंत डफरे, प्रदीप दाते, आरोग्य कर्मचारी संघटना अध्यक्ष सिद्धार्थ तेलतुबंडे, दीपक कांबळे, सुरेश गोसावी, वर्धा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित शेख, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे हरिचंद्र लोखंडे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी अधिकारी महासंघाच्या अन्नपुर्णा ढोबळे, विजय जांगडे, सुजाता कांबळे, मंगला इंगोले, ज्ञानेश्वरी डंबारे, मैना उईके, साहेबराव मुन, वैभव नंदरधने, बादल भालशंकर, दानिश फारुकी, गजेंद्र सुरकार यांनी विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. गोंविद पानसरे पुरस्कार २०१८ दरवर्षी प्रमाणे अतिथी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन आयटक जिल्हा संघटक असलम पठाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार माला भगत यांनी मानले. निलेश साटोणे, आशा पेंदोर, अमित कोपूलवार, संजय डगवार, प्रमोद लकडे, बादल भालशंकर स्वप्नील वेले, जयंता चव्हाण, अरुणा नागोसे, अतुल ठाकरे, अल्का भानसे, माया तितरे, चंदा मेश्राम, कल्पना कांबळे, संघमित्रा तामगाडगे, रंजना डफ, सुजाता बोबडे, माधूरी मुडे, रजनी अलोणे, वैशाली सातपुते, यशपाल डिकोले, रोशन टेभुर्णीकर, पवन ढगे, मोहन वालदे, सचिन तुरनकर, आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
विविध मान्यवरांचा गौरव
यंदाच्या वर्षी पुरस्कार पुरस्कार देऊन प्रकाश कथले, रूपेश खैरी, रमेश निमजे, पराग ढोबळे, नरेंद्र मते, चेतन व्यास, रेणुका कोटमकार, रविंद्र कोटमकार, प्रणिता राजूरकर, योगेश कांबळे, संजय बोंडे, विशाल कट्टोजवार, सुरेंद्र रामटेके यांना देण्यात आला. शाल श्रीफळ स्मृती चिन्ह तसेच डॉ. पानसरे लिखित शिवाजी कोण होता? हे पुस्तक देऊन सदर व्यक्तींना गौरविण्यात आले. तसेच नत्थुजी होलघरे, भाऊराव पोंगले, लक्ष्मण इटनकर, प्रधान काका, मारोतराव इमडवार, हरिदास जवूळकर, राजेश इंगोले यांनाही सन्मानित करण्यात आले.