वृक्षांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:56 PM2018-01-11T23:56:47+5:302018-01-11T23:56:59+5:30

जिल्ह्याला मोठा जंगलव्याप्त परिसर लाभलेला आहे. शिवाय अनेक रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांच्या रांगा आहेत. सध्या या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याचे निदर्शनास येते; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आहे.

Ignore the slaughter of trees | वृक्षांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष

वृक्षांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देबांधकाम विभागही उदासीन : चोरट्यांवर लक्ष ठेवण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याला मोठा जंगलव्याप्त परिसर लाभलेला आहे. शिवाय अनेक रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांच्या रांगा आहेत. सध्या या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याचे निदर्शनास येते; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची जबाबदारी बांधकाम विभाग सांभाळतो; पण काही ठिकाणी त्यांच्याच साक्षीने वृक्षांची कत्तल होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेत सबंध जगात वृक्षारोपणाची मोठी मोहीमच राबविली जात आहे. देशातही वृक्ष लागवडीवर भर दिला जात आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही खर्ची घातला जात आहे. शिवाय संगोपनासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे; पण वृक्षतोडीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ही विदारक स्थिती बदलणे गरजेचे असताना प्रशासन उदासिन दिसून येत आहे. परिणामी, लाकुडतोडे तथा कंत्राटदारांचे चांगलेच फावत असल्याचे दिसते. जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्या.पं.) तथा सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षतोड होत आहे. ही थांबविणे गरजेचे झाले आहे.
सुरगाव ते महाकाळ रस्त्यावरील वृक्षांची अवैध कटाई
पर्यावरणाचे संतुलनाकरिता वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी कार्र्यक्रम राबविले जात आहे; पण वृक्ष कटाईवर कुठलाही आळा घातला जात नाही. यामुळे ‘पालथ्या घागरेवर पाणी’ अशीच स्थिती होत आहे. यास प्रशासकीय उदासिनता जबाबदार असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्या सेलू तालुक्यातील काही मार्गांवर सर्रास वृक्षतोड होत असल्याचे दिसते.
रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. त्या झाडांच्या संवर्र्धनाची जबाबदारी ही बांधकाम विभागाची असते. त्याच वृक्षांवर कुºहाड चालविली जात असल्याचे दिसून येत आहे. शासकीय तसेच खासगी भूखंड हिरवेगार करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. तालुक्यात अनेक रस्त्यांच्या दुतर्फा विविध प्रजातीचे वृक्ष लावले आहेत. हे वृक्ष सध्या लाकूड चोरांसाठी पर्वणी ठरले आहे. सुरगाव ते महाकाळ या मार्गावरील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. याबाबत कंत्राटदारास विचारल्यास बांधकाम विभागाला माहिती आहे, असे सांगितले जाते.
याबाबत नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना कळविले; पण कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सेलू ते येळाकेळी रस्त्याने जाणाºया महाकाळ रस्त्याशेजारी तब्बल २० ते २५ बाभळीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. हा प्रकार सर्रास सुरू असताना बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.
वनविभागाने नुकतीच केली होती कारवाई
वन विभागाच्या हद्दीत येणाºया जंगल परिसरातही वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे सिद्ध झाले आहे. परवाना नसताना लाकडाची वाहतूक करणारे वाहन वन विभागाने गस्तीदरम्यान जप्त केले होते. ही कारवाई ३० डिसेंबर रोजी रात्री हिंगणी वनक्षेत्रात करण्यात आली. हिंगणी वन परिक्षेत्रातील कर्मचारी पवनार ते सुरगाव मार्गावर गस्त करीत असताना वाहनात आडजात लाकूड नेत असल्याचे दिसून आले. सदर वाहनाची तपासणी केली असता विनापरवाना ते लाकडाची वाहतूक करीत असल्याचे आढळले. यावरून वाहन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात चालकाने शेतमालक तथा कंत्राटदाराचे नावही सांगितले; पण परवाना कुणीही घेतल्याचे दिसून आले नाही. असाच प्रकार जिल्ह्यात सुरू असून सर्रास वृक्षांची कत्तल केली जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा तथा वनपरिक्षेत्रातील वृक्षांचीही कटाई केली जात आहे. या प्रकाराकडे बांधकाम विभाग, वन विभागाने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Ignore the slaughter of trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.