प्लॉट बळकावून केले अवैध बांधकाम

By admin | Published: June 28, 2014 12:35 AM2014-06-28T00:35:04+5:302014-06-28T00:35:04+5:30

दुसऱ्याच्या नावे असलेल्या खाली जागेवर बळजबरीने बांधकाम करण्यात आले़ तसेच याबाबत जाब विचारण्यासाठी प्लॉटमालक गेला असता..

Illegal construction done by the plot | प्लॉट बळकावून केले अवैध बांधकाम

प्लॉट बळकावून केले अवैध बांधकाम

Next

वर्धा : दुसऱ्याच्या नावे असलेल्या खाली जागेवर बळजबरीने बांधकाम करण्यात आले़ तसेच याबाबत जाब विचारण्यासाठी प्लॉटमालक गेला असता त्यास जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली़ मुकेश दशरथ मसराम असे प्लॉटधारक तक्रारकर्त्याचे नाव आहे़ याप्रकरणी रमाकांत धुळे याच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले़
निवेदनानुसार मुकेश मसराम याने मार्च २०१४ मध्ये पिपरी(मेघे) ग्राम पंचायत कक्षेतील शेत सर्व्हे क्रमांक ३०९ मधील प्लॉट क्रमांक ४/१ चा काही भाग व प्लॉट क्रमांक ३/१ चा काही भाग रजिस्टर्ड विक्रीपत्रान्वये अभय वामन जयसिंगकार यांच्याकडून विकत घेतला़ सदर प्लॉटच्या दक्षिणेस गैरअर्जदार रमाकांत धुळे यांचा प्लॉट व घर आहे़ रमाकांत धुळे व मुकेश मसराम यांचा प्लॉट लागून असून पूर्वी एकच भाग असल्यामुळे त्यांचा ७/१२ एकत्रित आहे़ परंतु मुकेश मसराम यांनी प्लॉट विकत घेतल्यापासून प्लॉटचा मालकी हक्क व ताबा हा त्यांचाच आहे.
काही दिवसापूर्वी मसराम यांनी आपल्या प्लॉटवर जाऊन पडताळणी केली असता धुळे याने प्लॉटवर येण्यास मज्जाव करीत अडथळा निर्माण केला आणि पुन्हा इकडे फिरकल्यास बरे होणार नाही अशी धमकी दिली. तसेच आपला मित्र पोलिस कर्मचारी गिरमकर याना फोनद्वारे बोलावून मसरामवर दबाव आणला. मारत नेऊन पोलीस स्टेशनमध्ये बंद करून खोट्या केसमध्ये फसवील अशी धमकीही दिली़ या बाबतची तक्रार मसराम याने ०२ जून २०१४ रोजीच अधीक्षाकांकडे केली आहे.
त्यानंतर मसराम हे ३ जून २०१४ रोजी सकाळी प्लॉटवर जावून पाहणी करण्यासाठी गेले असता आपल्या प्लॉटवर गैरअर्जदारानी स्लॅबचे बांधकाम सुरू केल्याचे त्यांना आढळले. यावेळी मसराम सोबत राजेश अण्णाजी इंगोले हेदेखील हजर होते. धुळे यास प्लॉटवर सुरू केलेल्या अवैध बांधकामाबद्दल विचारणा केली असता मारहाण करीत मसराम यास जातीवाचक शिवगाळ केली़ याबाबत ३ जून २०१४ रोजी पोलीस अधीक्षक, पोलिस स्टेशन वर्धा व जिल्हाधिकारी, यांचेकडे लेखी तक्रार दिली. परंतु अद्यापही धुळे याच्यावर कोणतीही कायदेशिर कारवाई झालेली नाही़ त्यामुळे प्लॉटवर बांधकाम सुरूच आहे़ धुळे याच्या वर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे मसराम यांनी केली आहे़(शहर प्रतिनिधी)

Web Title: Illegal construction done by the plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.