नाल्यातून होतेय रेतीचे अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:46 AM2018-12-31T00:46:04+5:302018-12-31T00:46:35+5:30
परिसरातील पोटी व साती शिवारातील वर्धा नदीपात्रातुन मागील काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून मालवाहूच्या सहाय्याने त्याची वाहतूक ेकेली जात आहे. असे असताना परिसरातील नाल्यांमधूनही रेती माफिया वाळूची चोरी मनमर्जीने चोरी करीत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोझरी (शे.) : परिसरातील पोटी व साती शिवारातील वर्धा नदीपात्रातुन मागील काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून मालवाहूच्या सहाय्याने त्याची वाहतूक ेकेली जात आहे. असे असताना परिसरातील नाल्यांमधूनही रेती माफिया वाळूचीचोरी मनमर्जीने चोरी करीत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. त्याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ योग्य कारवाई करण्याची मागणी आहे.
रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. मोझरी येथील शेतकरी दिनेश काळे यांचे मौजा पोेटी शिवारात आठ एकर शेत आहे. या शेताच्या मधोमधून नाला वाहतो. सध्या तो कोरडा पडला असून याच नाल्यातून सध्या मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केली जात आहे. हा संपूर्ण प्रकार मनमर्जीने सुरू असताना त्याकडे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाळू माफियांकडून रात्रीच्या सुमारास अवैध उत्खनन करून वाळूची वाहतूक केली जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाळूचा साठा ट्रॅक्टरमध्ये लादून ते पांदण रस्त्याने नेली जात असल्याने रस्त्याची दैना झाली आहे. बहूता वाळू माफियांकडून शेतपिकांचे नुकसान केले जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकरणाची माहिती काही अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र, तेही दुर्लक्ष करीत असल्याने तालुका व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देत वाळू माफियाच्या मनमर्जीला आळा घालण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे. अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे.