वनजमिनीवर अवैध खनन; गुरांची होतेय उपासमार

By admin | Published: November 9, 2016 01:05 AM2016-11-09T01:05:24+5:302016-11-09T01:05:24+5:30

चराईक्षेत्र घटले आणि चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने गुरांच्या संख्येत घट होत आहे.

Illegal mining on forest land; Hunger hungry for cattle | वनजमिनीवर अवैध खनन; गुरांची होतेय उपासमार

वनजमिनीवर अवैध खनन; गुरांची होतेय उपासमार

Next

गोपालक, शेतकरी त्रस्त : विटांसाठी केला जातोय मातीचा उपसा, प्रशासनाचे दुर्लक्ष
विनोद घोडे  चिकणी (जामणी)
चराईक्षेत्र घटले आणि चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने गुरांच्या संख्येत घट होत आहे. यामुळे परिसरातील गोपालक, शेतकरी गुरे चारण्याकरिता वन विभागाच्या पडिक १०० ते १२५ एकर जमिनीचा उपयोग करीत होते; पण या जमिनीवरही आता खनन होत असल्याने चराई क्षेत्र घटले आहे. परिणामी, गुरांची उपासमार होत आहे.
परिसरातील जमीन मुरमाटी (बरड) भाग असल्याने येथे लगतच्या गावातील गुरेही चरण्याकरिता आणली जातात. कालांतराने या परिसरात पाच वीटभट्ट्या सुरू झाल्या. विटांसाठी मातीची गरज असते. मातीसाठी काही शेतजमिनी विकत घेतल्या. एवढ्या मातीने होत नसल्याने वन विभागाच्या जमिनीवरही खन्नन करून माती नेली जात आहे. खन्नन होत असल्याने येथे खड्डे पडले असून गवत उगवत नाही. गवत न उगविल्याने गुरे चरू शकत नाहीत. यामुळे गुरांख्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अवैध खननाकडे वन विभागानेही दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत आहे. यामुळे आता गुरे कुठे चारावित, असा प्रश्न शेतकरी व गोपालकांना पडला आहे.
वन अधिकाऱ्यांशी या वीटभट्टी धारकांची हात मिळवणी आहे की काय, असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. वीटभट्ट्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परिणामी, आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. वन विभागाच्या पडिक जागेमध्ये अवैधरित्या खनन करून माती चोरली जात असल्याने महसूलही बुडत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत संबंधितांवर कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Illegal mining on forest land; Hunger hungry for cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.