अवैधरीत्या साठवणूक केलेल्या रेतीचा लिलाव
By admin | Published: June 28, 2014 12:33 AM2014-06-28T00:33:27+5:302014-06-28T00:33:27+5:30
हिंगणघाट : येथील वणा नदी जवळच्या शितला माता मंदिर परिसरात रेती माफीयांनी अवैधरित्या रेतीचा साठा केला होता.
हिंगणघाट : येथील वणा नदी जवळच्या शितला माता मंदिर परिसरात रेती माफीयांनी अवैधरित्या रेतीचा साठा केला होता. हा साठा तहसीलदार दीपक करंडे व महसूल कर्मचाऱ्यांनी जप्त केला. त्या रेतीसाठ्याचा शुक्रवारी लिलाव करण्यात आला. हा लिलाव मे. गोल्हर जिनिंग अॅण्ड आईल इंडस्ट्रीजने १८ लाख रुपयांत खरेदी केला. यात शासनाला खर्च वजा जाता १५ लाख ४० हजाराचा निव्वळ महसूल तालुक्याला प्राप्त झाला. वना नदीच्या शहरालगत असलेल्या रेती घाटातील रेती माफीयांकडून अवैधरित्या वाहतूक करून शितला मातता मंदिर परिसरातील विस्तृत जागेवर साठवून ठेवली होती. या रेतीची वाटेल तेव्हा उचल करून ती नागरिकांना विकण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार करंडे यांना मिळाली. त्यांनी सदर रेती बद्दल आठ दिवसाचा जाहिरनामा काढुन रेतीबाबतच्या हक्काची माहिती मागविली. असे असले तरी त्या रेतीवर आपला हक्क आहे असे सांगणारे कोणीच समोर आले नाही. त्यामुळे सदर रेती अवैध असल्याचे जाहीर करीत ती तहसील कार्यालयाच्या परिसात आणण्यात आली. या दरम्यान मंडळ अधिकारी कावळे, व्ही.एच. उके, आर.टी. उके, तलाठी वकोरीया, दाते आदींनी दिवसरात्र जागता पहारा देवून संभाव्य चोरटी वाहतूक रोखून धरली. त्यांना रेती वाहतुकीसाठी निनावे यांनी सहकार्य केले. सदर ५३२ ब्रास रेतीसाठा जाहीर लिलावाद्वारे विकण्याची जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळताच जाहिरनामा काढुन शुक्रवारी त्याचा लिलाव करण्यात आला. या लिलावात एकूण पाच जण सहभागी होते; परंतु प्रत्यक्षात चार जणांनी बोलित सहभाग घेतला. ५३२ ब्रास रेती आधारभूत किंमत ११ लाख १७ हजार २०० रुपये असताना स्पर्धात्मक बोलीतून शेवटी गोल्हर जिनिंग अॅण्ड आईल प्रा.लि. हिंगणघाटने तो १८ लाख रुपयात खरेदी केला. एक चतुथांश रक्कम चलान द्वारा शासन खजिन्यात जमा केली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेती साठा विरोधरात धडक मोहीम राबविल्याने शासनाला लाखोचा महसूल प्राप्त झाला. या लिलावामुळे व महसूल विभागाच्यावतीने सुरू असलेल्या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असून कारवाई अशीच सुरू ुठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी) अवैध रेतीची वाहतूक; नऊ ट्रॅक्टर जप्त येथील तहसीलदार दीपक करंडे यांनी शुक्रवारी पहाटे ५ वाजता वणा नदीच्या गणेशपूर रेती घाटावर सहकाऱ्यांसोबत धाड घालून अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या नऊ ट्रॅक्टरला ताब्यात घेतले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. हे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या आवारात उभे आहेत. रात्री व पहाटे नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार करंडे यांना मिळाली. त्यामुळे करंडे यांनी मंडळ अधिकारी दिलीप कावळे, रविंद्र चकोले, तलाठी नकोरीया, अन्न पुरवठा निरीक्षक टेकाडे, शिपार्ई सुनील आत्राम व बोरगाव येथील कोतवाल बालू सातघरे यांना सोबत घेत पहाटे ५ वाजताचे दरम्यान ही धाड घातली. यावेळी नदीपात्रातून रेतीची वाहतूक करताना नऊ ट्रॅक्टर्स मिळून आले. या ट्रॅक्टर्सला नदी पात्रातच अधिकाऱ्यांनी ताब्यात घेवून ट्रॅक्टर मधील रेती नदी पात्रात रिकामी केली व ट्रॅक्टरला चलान करून तहसील कार्यालय परिसरात आणले. यात शेख महंमद शेख नुर यांचा एम.एच.३२ पी. ३५५७, नामदेव डांगरे यांचा एम.एच.३२ एफ.२०५, अब्दुल जावेद कुरेशी यांचा एम.एच.३२ पी ९५६२, प्रशांत घवघवे यांचा एम.एच.२९/७१८३, सुनील ढोकपांडे यांचा एम.एच.३२ पी.९४२, धनपाल डोंगरे यांचा एम.एच.३२ पी ७९०९, महेश घुमडे यांचा एम.एच.३२ पी.९२४, राहुल निखाडे एम.एच.३२ नंबर नाही. प्रकाश गाळे यांच्या एम.एच.३२ ए.२९७५ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे.