अवैध वाळूसाठा चोरी प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:17+5:30
जप्त केलेला ३० ब्रास वाळूसाठा तळेगाव (श्या.पं.) ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांच्याकडे सुपूर्तनाम्यावर सोपविण्यात आला होता. मात्र, त्याच रात्री ३० ब्रास वाळूसाठा अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांनी १७ जानेवारीला तळेगाव पोलिसांत तक्रार दिली होती. ३० ब्रास वाळूसाठा चोरी प्रकरणाच्या तपासात अद्याप सत्य पुढे न आल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : वर्धा नदीघाटातून अज्ञाताने अवैध वाळूची वाहतूक करीत मौजा काकडदरा येथील कब्रस्तानात ३० ब्रास रेती (किंमत १ लाख २० हजार रुपये) ची साठवणूक केली होती. हा वाळूसाठा मंडळ अधिकारी तळेगाव व सहकाऱ्यांनी १६ जानेवारीला रात्रीच्या सुमारास पंचनामा करुन जप्त करण्यात आला होता.
जप्त केलेला ३० ब्रास वाळूसाठा तळेगाव (श्या.पं.) ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांच्याकडे सुपूर्तनाम्यावर सोपविण्यात आला होता. मात्र, त्याच रात्री ३० ब्रास वाळूसाठा अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांनी १७ जानेवारीला तळेगाव पोलिसांत तक्रार दिली होती. ३० ब्रास वाळूसाठा चोरी प्रकरणाच्या तपासात अद्याप सत्य पुढे न आल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.
३० ब्रास वाळूची चोरी होणे हे दोन-चार तासांच्या कालावधीचे काम नसून इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला वाळूसाठा उचलून नेण्याकरिता चार ते पाच ट्रॅक्टरला ८ ते १० तासांचा कालावधी नक्कीच लागत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
८ ते १० तासाच्या कालावधीत रेती चोरटे कुणाच्या कसे निदर्शनास पडले नाही? यात मोठे अर्थकारण घडले असावे काय, त्यामुळेच वाळूचोरी प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात पडला नसावा, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाले आहे.
कापसी घाटातून अवैध वाळूउपसा
मोझरी (शे) - नजीकच्या कापसी येथील वर्धा नदीतून वाळूतस्तकरांकडून रात्रंदिवस वारेमाप चोरट्या मार्गाने वाळूउपसा करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू आहे. यात शासनाच्या महसुलाला चुना लागत आहे. याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष का, असा नागरिकांचा सवाल आहे. कापसी घाटातून कापसी-मोझरी शेकापूरमार्गे ट्रॅक्टरद्वारे वाळूचोरीचा गोरखधंदा बिनदिक्कमतपणे सुरू असतो. वाळूतस्कारांनी मार्गावर ठिकठिकाणी खबरे तैनात केलेले असतात. चोरीची वाळू भरलेली वाहने कुठल्याही अधिकाºयांच्या हाती लागू नये म्हणून कानगाव, मोझरी, कापसी येथून शासकीय वाहनांवर पाळत ठेवली जाते. खबºयांकडून तस्करांना माहिती पुरविली जाते. वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे कापसी ते मोझरी तसेच कालव्यांनी निघणाºया मार्गाची प्रचंड दुर्दशा झाली आहे. असे असताना वाळूतस्करांना पाठीशी का घालण्यात येत आहे, असा नागरिकांचा सवाल आहे. वाळूतस्करांवर कारवाई करून शासनाचा महसूल वाचवावा, अशी मागणी होत आहे.