देवळी-पुलगाव मार्गावर अवैध वृक्षकटाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:17 PM2017-11-01T23:17:00+5:302017-11-01T23:17:11+5:30
देवळी-पुलगाव रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची अवैधरित्या कटाई करण्यात येत आहे. वर्दळीच्या रस्त्यालगत असलेल्या या बाभळीच्या झाडावर कुºहाड चालत असतानाही सार्वजनिक बांधकाम .....
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : देवळी-पुलगाव रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची अवैधरित्या कटाई करण्यात येत आहे. वर्दळीच्या रस्त्यालगत असलेल्या या बाभळीच्या झाडावर कुºहाड चालत असतानाही सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे याकडे लक्ष नाही काय असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहे.
हा प्रकार गत एक महिन्यापासून सुरू आहे. मात्र याला पायबंद घालण्यात आला नाही. अवैधरित्या वृक्षकटाई करणारे एक दिवस काम करतात नंतर पुढील पाच दिवस काम बंद ठेवले जाते. हा नित्यक्रम असून यामुळे पर्यावरणाची अपरिमीत हानी होत आहे. हा गोरखधंदा परिसरात जोमाने सुरू असताना संबंधीत विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्त्यालगतची मोठमोठी बाभळीची झाडे धराशाही होत आहे. वृक्षकटाई काही दिवसाच्या अंतराने होत असल्यामुळे ये-जा करणाºयांच्या ही बाब सहजरित्या लक्षात येत नाही. मशीनद्वारे कटाई करण्यात येत असे, असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येते. सदर प्रकाराची माहिती बांधकाम विभागाला देण्यात आली. तरी याकडे दुर्लक्ष केले. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता एकीकडे शासन वृक्षलागवड मोहीम राबवित आहे. यावर कोट्यवधी रूपये खर्च होत आहे. समाजकंटकाकडून वृक्षकटाई केली जाते तरी संबंधीत दुर्लक्ष करीत आहे.
कडक कारवाईची ग्रामस्थांची मागणी
सदर वृक्षकटाई खुलेआम होत असल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाºयांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला तरी योग्य उत्तर दिले जात नव्हते. शासकीय काम असल्याचे सांगून टोलविण्यात आले. सदर घटनेकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देत चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
सदर परिसरातील काही झाडांना कटाईची परवानगी दिली आहे. मात्र अवैध वृक्षकटाई होत असेल तर अशा घटनांबाबत वरिष्ठांशी बोलून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
- अनिल भूत,
अभियंता, सां.बा. उपविभाग, देवळी.