अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्व्हे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:00 AM2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:16+5:30

शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. समृद्धी महामार्गाचे काम अ‍ॅफकॉन्स कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. कंपनीचे ट्रॅक शेतशिवारातून जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. तसेच रस्त्यालगतची पिके धुळीमुळे खराब होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.

Immediately survey the damage caused by the rains | अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्व्हे करा

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्व्हे करा

googlenewsNext
ठळक मुद्देपंकज भोयर यांनी केली पाहणी : प्रशासनाला दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीचा सर्व्हे करण्यात यावा, असे निर्देश आमदार पंकज भोयर यांनी प्रशासनाला दिले.
शनिवारी आमदार डॉ. भोयर यांनी उमरी (मेघे) येथील शेतीची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक इंगळे, पंचायत समितीचे सभापती महेश आगे, सरपंच नंदा उघडे, नायब तहसीलदार इसाये, डॉ. शकुंतला पाराजे, जाधवर, उपसरपंच सचिन खोसे, विस्तार अधिकारी देवताळे, ग्रामसेवक ईवनाथे, पटवारी यशवंत लडके, कृषी सहायक राठोड, राजू मडावी, शेतकरी बबनराव कोसे, ग्रामपंचायत सदस्य कुलदीप चौधरी, दिलीप ढगे, सुरेश आगलावे, रंजना वाढई, सुषमा रेवतकर, जितू पुरोहित व शेतकरी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. भोयर यांनी शेतातील कपाशी, तूर, गहू, चणा आदी पिकांची पाहणी केली. पावसामुळे कापूस भिजल्याने मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसासह गारपीट झाल्याने कपाशी, तूर या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. समृद्धी महामार्गाचे काम अ‍ॅफकॉन्स कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. कंपनीचे ट्रॅक शेतशिवारातून जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. तसेच रस्त्यालगतची पिके धुळीमुळे खराब होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. याबाबत त्वरित कारवाई करावी, असे आदेश आमदार डॉ. पंकज भोयर यांनी संबंधितांना दिले.

Web Title: Immediately survey the damage caused by the rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.