‘ड्राय झोन’ जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:24 AM2018-02-21T00:24:07+5:302018-02-21T00:26:19+5:30
शासनाने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. या तीन जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास हे तीन जिल्हे राज्यात आदर्श जिल्हे म्हणून ओळखल्या जावू शकते.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : शासनाने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. या तीन जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास हे तीन जिल्हे राज्यात आदर्श जिल्हे म्हणून ओळखल्या जावू शकते. यामुळे ‘ड्राय झोन’ असलेल्या या जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियानाच्यावतीने शासनाला करण्यात आली. या मागणीकरिता वर्धेत मंगळवारी एक मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी समर्थक सामाजिक कार्यकर्त्याची बैठक २७ व २८ जानेवारी २०१८ रोजी चितेगाव त.मूल, जि.चंद्रपुर येथे झाली. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना सुचविण्यात आल्यात. यात अवैध दारू विक्रेत्यांवर मुंबई दारूबंदी अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई केली जात आहे. हा कायदा अतिशय सौम्य असून, याचा कोणताही वचक नाही. त्यामुळे दारूबंदी जिल्ह्यांचा ‘ड्रायझोन’ तयार करून त्यासाठी कायद्यात वेगळी तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.
दारूविके्रत्याला लवकर जामीन मिळू नये यासाठी नियम कडक झाले पाहिजे, शिक्षेचे प्रमाण वाढले पाहिजे, अट्टल गुन्हेगारीवर कडक कार्यवाही झाली पाहिजे, ड्रायझोनमध्ये अवैध दारू पुरवठा करणाºया सप्लायर, डिलरवर कडक कार्यवाहीची तरतुद, दारू पिणाºयांवर कडक कार्यवाहीची तरतुद, अवैध दारूची वाहतूक करणारे वाहन नेहमीकरिता जप्त ठेवण्याची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्त्व पारोमिता गोस्वामी यांनी केले. निवेदन देतेवेळी विजय सिद्धेरवार, सुलेमान बेग, गौरव शामकुळे, सुरेश कोवे, सुचिता इंगोले, गोविंद पेटकर यांची उपस्थिती होती.
लोकसहभागासाठी समिती
‘ड्रायझोन’ जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा याकरिता समित्या तयार करण्यात याव्या.
स्वतंत्र पोलीस दल
चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा निर्णय घेतांना मंत्रिमंडळाने, तिनही जिल्ह्यातील दारूबंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस दलाची निर्मिती करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र मागील तीन वर्षात यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील दारू परवाने रद्द करण्यात यावे
वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी, तिथे दारू पिण्याचे परवाने दिले जात असल्याने या परवानाचा गैरफायदा घेवून अवैद्य दारू विक्री केली जात आहे. यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील दारू पिण्यांचे परवाने रद्द करण्यात यावे.
व्यसनमुक्तीसाठी आरोग्य विभागात स्वतंत्र कक्ष द्या
सेवाग्राम येथील रुग्णालयात डॉ. जाजू यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती केदं्राचे अभ्यास करुन याच धर्तीवर ‘ड्रायझोन जिल्ह्यात’ प्रत्येक रुग्णालयात व्यसनमुक्तीचे स्वतंत्र विभाग तयार करण्यात यावे,
जिल्ह्यात फॉरेन्सिक लॅब देण्याची मागणी
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यासाठी स्वतंत्र फॉरेन्सिक लॅबची मागणी करण्यात आली होती व शासनस्तरावर ती मान्यही करण्यात आली होती. मात्र अजुनही ही लॅब तयार न झाल्याने अवैद्य दारू विक्रेत्यांवरील गुन्हे सिद्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे.
अट्टल विक्रेत्यांवर एमपीडीए कारवाई
अवैद्य दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करता यावी यासाठी त्यांचेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून तडीपार आणि मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम ९३ नुसार कारवाई करावी.