वृक्षलागवडीला लोकचळवळीचे महत्त्व यावे

By admin | Published: June 29, 2017 12:45 AM2017-06-29T00:45:57+5:302017-06-29T00:45:57+5:30

वनविभाग व सामाजिक वनीकरण व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन यांच्यावतीने आयोजित वृक्षदिंडीचे देवळीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

The importance of Lok Dal should be important for the trees | वृक्षलागवडीला लोकचळवळीचे महत्त्व यावे

वृक्षलागवडीला लोकचळवळीचे महत्त्व यावे

Next

अनिल सोले : देवळीत ढोलताशाच्या गजरात वृक्षदिंडीचे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : वनविभाग व सामाजिक वनीकरण व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन यांच्यावतीने आयोजित वृक्षदिंडीचे देवळीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष आमदार अनिल सोले, खासदार रामदास तडस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्या नेतृत्वात आगमन झालेल्या दिंडीची संपूर्ण शहरात प्रभातफेरी काढून नागरिकांना संदेश देण्यात आला.
दिंडीत सहभागी महिला भजनी मंडळाने वीणा व ढोलकीचा ताल धरुन वृक्षदिंडीला धार्मिक स्वरूप दिले. न.प. कार्यालयाजवळ वृक्षदिंडीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी आयोजित सभेत खासदार तडस यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद करुन ही लोकचळवळ म्हणून फोफावणे गरजेचे झाले आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बदलत आहे. आज पाणी सुद्धा विकत घ्यावे लागत आहे. रेल्वे स्टेशनवर पाण्याची बॉटल विकत घेवून तहान भागविली जात आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर जात आहे. निसर्गाच्या असमतोलआने हे होत आहे. याची वेळीच दक्षता घेवून वृक्ष लागवडीला चळवळीचे स्वरूप देण्याची गरज आ. सोले यांनी व्यक्त केली.
यानंतर उपस्थितांना वृक्षलागवड करण्याची शपथ देण्यात आली. न.प. व प.सं. परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाला जि.प. सभापती मुकेश भिसे, प.सं. सभापती विद्या भुजाडे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, पंकज तडस, राहुल चोपडा, किरण तेलरांधे, गटनेता शोभा तडस, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती कल्पना ढोक, सारीका लाकडे, सुनीता ताडाम, नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, मारोती मरघाडे, अ. नईम, प.सं. सदस्य शंकर उईक, स्वप्नील खडसे, दशरथ भुजाडे, नरहरी कामडी, प्रा. पंकज चोरे, उमेश कामडी, भाजपा युवा मोर्चाचे अजिंक्य तांबेकर, स्वप्नील भगत, नितीन सायंकार, महादेव सुरकार, देवेंद्र येनुरकर, अशोक क्षीरसागर, राजू भोयर, डॉ. श्रावण साखरकर, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: The importance of Lok Dal should be important for the trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.