बालकाचे शोषण करणाऱ्यास कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:51 PM2019-06-12T23:51:05+5:302019-06-12T23:51:38+5:30
शारीरिकदृष्ट्या अशक्त असलेल्या दहा वर्षीय बालकाला चॉकलेटचे आमिष देऊन अनैसर्गिक कृत्य करणाºया आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्वाळा विशेष सत्र न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शारीरिकदृष्ट्या अशक्त असलेल्या दहा वर्षीय बालकाला चॉकलेटचे आमिष देऊन अनैसर्गिक कृत्य करणाºया आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्वाळा विशेष सत्र न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी दिला.
मनोज सुरेश टेंभरे (२४) रा. दिग्रस, ता. सेलू असे आरोपीचे नाव आहे. पीडित बालक हा मित्रांसोबत मनोजच्या घराजवळ खेळत असताना त्याला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वत: च्या घरी नेत अनैसर्गिक कृत्य केले. वेदना असह्य झाल्याने पीडित बालक रडत घराबाहेर पडला. तेवढ्यात पीडिताचे वडील तेथे आले असता त्यांचा मुलगा त्यांना रडताना दिसला. त्यांनी मुलाला विचारणा केल्यावर त्यांने घडलेला प्रकार सांगितला.
पीडिताचे वडील काही लोकांसह आरोपीच्या घरात शिरले असता आरोपीने मागील बाजूने पळ काढला. त्यामुळे पीडिताच्या वडिलांनी सरळ सिंदी (रेल्वे) पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार नोंदविली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शेख व तपास अधिकारी दिगंबर गांजरे यांनी नागरिकांचे बयाण, वैद्यकीय तपासणी करून आरोपी मनोजविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यावर शासनातर्फे ९ साक्षीदार तपासून युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. तसेच पीडिताला शासनार्फे ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचाही आदेश देण्यात आला.
या प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक अभियोक्ता अमोल कोटंबकर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून राजेंद्र तिवारी यांनी सहकार्य केले.