भाड्याच्या घराला आग लावणाऱ्यास दंडासह कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:34 PM2019-07-15T22:34:29+5:302019-07-15T22:34:44+5:30
भाड्याच्या घराला पेट्रोल टाकून आग लावणाºयास कलम ४३५ नुसार ५ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा न्यायनिवाडा जिल्हा सत्र न्यायाधीश-२ आर.एम. मिश्रा यांनी केला. लोकेश उर्फ गुड्डू चिंतामण शेंडे (४१) रा. सावंगी (मेघे) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भाड्याच्या घराला पेट्रोल टाकून आग लावणाºयास कलम ४३५ नुसार ५ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा न्यायनिवाडा जिल्हा सत्र न्यायाधीश-२ आर.एम. मिश्रा यांनी केला. लोकेश उर्फ गुड्डू चिंतामण शेंडे (४१) रा. सावंगी (मेघे) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, २९ मार्च २०१७ ला रात्री आरोपी लोकेश शेंडे याने त्याची पत्नी, तीन मुली व एक मुलगा तसेच आई राहत असलेल्या घराला पत्नी सोबत पटत नसल्यामुळे पेट्रोल टाकून आगीच्या हवाली केले. फिर्यादी आई सुशीला चिंतामण शेंडे हिने आरोपी लोकेश यास पेट्रोल टाकून पळून जाताना प्रत्यक्ष पाहिले होते. आगीमुळे घरातील कपडे, गादी, इलेक्ट्रिक बोर्ड आदी साहित्य जळाल्याने त्यांचे ५ हजार रूपयांचे नुकसान झाले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार जळालेला माल जप्त करण्यात आला होता. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून यापूर्वी देखील त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३०७, ३८०, ४५७ तसेच दारूबंदी कायदा आणि हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. आरोपी काही दिवसापूर्वीच नागपूर येथील कारागृहातून सुटला होता. तपासादरम्यान आरोपीविरूद्ध सबळ पुरावे गोळा करण्यात आले. प्रत्यक्षदर्शी आईनेच मुलाविरुद्ध साक्ष कायम ठेवल्यामुळे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला. या प्रकरणाचा तपास पोहवा प्रकाश निमजे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. प्रकरण साक्षपुराव्यावर आले असता सरकारी अभियोक्ता व्ही.एन. देशमुख यांनी ३ साक्ष पुरावे नोंदविले आणि युक्तिवाद केला. साक्षपुरावे व युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश-२ आर.एम. मिश्रा यांनी आरोपीस सदर शिक्षा ठोठावली.