समाजाच्या सुधारणेसाठी इस्लामी चरित्रानुसार वागणे गरजेचे

By admin | Published: February 9, 2017 12:47 AM2017-02-09T00:47:26+5:302017-02-09T00:47:26+5:30

कुठल्याही समाजाची सुधारणा, रचना आणि विकास हा तेथील लोकांवर अवलंबून असतो.

To improve the society, it is necessary to behave as an Islamic character | समाजाच्या सुधारणेसाठी इस्लामी चरित्रानुसार वागणे गरजेचे

समाजाच्या सुधारणेसाठी इस्लामी चरित्रानुसार वागणे गरजेचे

Next

मुक्ती अब्दुल कवी फलाही : इस्लामी हिंदचे संमेलन
वर्धा : कुठल्याही समाजाची सुधारणा, रचना आणि विकास हा तेथील लोकांवर अवलंबून असतो. आम्ही आज समाज सुधारणेचे कार्य करीत आहो. समाजाच्या सुधारणेसाठी सर्व प्रथम स्वत: इस्लामी चरित्रानुसार वागणे आवश्यक आहे. जर आपण एक आदर्श समाज इच्छितो तर आम्हाला इस्लामी शिकवणीने आणि आदेशाचे पालन करावे लागले, असे प्रतिपादन मज्लिस उल्माए त्रिकोणी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मुक्ती अब्दुल कवी फलाही यांनी केले.
स्थानिक माहेश्वरी भवनात इस्लामी हिंद वर्धाच्यावतीने आयोजित संमेलनात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी शोबा ए इस्लामी मुआशरा सदस्य काजी लईक अहमद, इमाम मस्जिद सावंगीचे काजी रमजान अली, निर्माण फाऊंडेशनचे आमिर अली अरजानी, नागपूर संगठनचे सदस्य मुहम्मद अय्यूब खान, महिला विभागच्या जिल्हा अध्यक्ष गाजिया सुल्ताना यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मुक्ती अब्दुल कवी फलाही पुढे म्हणाले, ज्या मोमीनसारखे चरित्र ज्याचे रूप कुराणने प्रस्तुत केले. ज्या चरित्राला मोहम्मद पैगंबर (सअव) यांनी आपल्या जीवनात उतरवून दाखविले. परिणामी त्यांच्या साहाबांनी ते आत्मसात करून विशुद्ध समाज रचला. आज आम्ही स्वत: इस्लामी शिकवणीने स्वत:ला ओतप्रोत करून आमची ओळख इस्मामिक शिकविणीने करून दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान संगठनचे जिल्हा अध्यक्ष सय्यद नियाज अली यांनी मार्गदर्शन केले. नागपूर संगठनचे सदस्य मुहम्मद अय्यूब खान यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन काजी हकीमुद्दीन व अब्दुल कदीर यांनी केले. कार्यक्रमाला मुस्लीम समाजाचे पुरूष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी इस्लाम काय शिकवते यावर भाष्य केले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: To improve the society, it is necessary to behave as an Islamic character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.