बेरोजगार उमेदवारांच्या नोंदणीसाठी आता सुधारित वेबपोर्टल
By admin | Published: January 19, 2017 12:40 AM2017-01-19T00:40:47+5:302017-01-19T00:40:47+5:30
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत बेरोजगार उमेदवार आणि रोजगार पुरविणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यासाठी
वर्धा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत बेरोजगार उमेदवार आणि रोजगार पुरविणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यासाठी वेबपोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. यात सुधारणा करण्यात आल्या असून नवीन वेबपोर्टल ४ जानेवारीपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवर जुन्या महारोजगार वेबपोर्टलवरील उमेदवार व नियोक्ते आणि रिक्तपदे याबाबतची सर्व माहिती टाकण्यात आली आहे. नवीन वेबपोर्टलवरुन सर्व कामकाज करावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे संहायक संचालक एम.जी. घाटोळ यांनी केले आहे.
याबाबत बैठक घेऊन त्यांनी सूचना केल्या. नवीन वेबपोर्टवर जुन्या महारोजगार वेबपोर्टलवरील युझर आयडी व पासवर्ड टाकल्यास नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये आधार क्रमांक अत्यावश्यक असून, आॅनलाईन पडताळणी करूनच पुढे जाता येईल. तसेच एकदा नोंदणी क्रमांक प्राप्त झाल्यावर धारक पासवर्ड विसरला असल्यास अथवा लॉगईन होत नसल्यास उमेदवारांना फॉरगॉट पासवर्ड ही सुविधा देण्यात आली आहे. नवीन उमेदवार व नियोक्ते नोंदणी, रिक्तपदे अधिसूचित करणे, उमेदवार व नियोक्ते नोंदणीचे अद्ययावतीकरण करणे यासर्व बाबी यापुढे नवीन वेबपोर्टलवर उपलब्ध राहणार आहे. सध्या महारोजगार वरून या सेवांसाठी नवीन प्रणालीकडे ते आपोआप वळते करण्यात येईल. नियोक्ते यांनी रिक्तपदे अधिसूचित करणे व त्याबाबतची पुढील आवश्यक सर्व कार्यवाही उमेदवारांची यादी डाऊनलोड करणे, उमेदवार शेड्यूल करणे व त्यांचा प्रोफाईल पाहणे, प्लेसमेंट भरणे इत्यादी कामे यापुढे या वेबपोर्टलवरून करावेत. नियोक्ते यांनी तिमाही व द्विवार्षिक विवरणपत्रे पुढील सूचना मिळेपर्यंत महारोजगार वेबपोर्टलवर पूर्वीच्याच लॉगईन आयडी व पासवर्ड वापरून भरावे, अशी माहिती देण्यात आली आहे.
याबाबत उमेदवरांना अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातून मार्गदर्शन मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)