दहावीत मुलीच ठरल्या भारी; वर्धा जिल्हा विभाग तळाला
By रवींद्र चांदेकर | Published: May 27, 2024 03:43 PM2024-05-27T15:43:57+5:302024-05-27T15:45:08+5:30
९२.०२ टक्के निकाल : आर्वीची साक्षी गांधी प्रथम
वर्धा : बारावीनंतर सोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलीच भारी ठरल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला. जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.०२ टक्के लागला आहेे. आर्वी येथील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलची साक्षी मनोज गांधी ९९.८० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिली आली आहे.
नागपूर विभागात जिल्हा दहावीच्या निकालात तळाला गेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये दहावीची परीक्षा घेतली होती. जिल्ह्यातून १५,८६० विद्यार्थी प्रविष्ट होते. यात मुले ८ हजार ३०३, तर मुली ७ हाजार ५५७ ७ होत्या. प्रत्यक्षात ८ हजार १९६ मुले आणि ७ हजार ५१७ मुली अशा एकूण ११५ हजार ७१३ जणांनी परीक्षा दिली होती. यापैकी १४ हजार हजार ४६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात सात हजार १५१ मुली, तर सात हजार ३०९ मुलांंचा समावेश आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का जास्त आहे. ९५.१३ टक्के मुली, तर ८९.१७ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ८७.९८ टक्के लागला होता. त्या तुलनेत यंदा टक्केवारीत ४.०४ टक्के वाढ झाली आहे.
पाच हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत
जिल्ह्यातील पाच हजार १५० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत चार हजार ५५०, तर तृतीय श्रेणीत चार हजार ७६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.