अवघ्या बारा दिवसात सोन्याच्या भावात तब्बल दोन हजारांची तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 05:00 AM2022-02-13T05:00:00+5:302022-02-13T05:00:35+5:30

रशिया आणि युक्रेन यांच्यात तणाव वाढत आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर पडला असून शुक्रवारी ४८ हजार ९०० रुपयांवर पाहिलेल्या सोन्याचे दर शनिवारी थेट ४९ हजार ९०० वर पोहोचले. ३१ जानेवारीला सोन्याचे दर प्रती तोळा ४८ हजार रुपये होता. तर शनिवार १२ फेब्रुवारीला सोन्याचा प्रती तोळा भाव ४९ हजार ९०० रुपये राहिला. एकूणच मागील बारा दिवसांच्या काळात सोन्याच्या दरात दोन हजारांची तेजी आली आहे.

In just twelve days, the price of gold has risen by a whopping 2,000 | अवघ्या बारा दिवसात सोन्याच्या भावात तब्बल दोन हजारांची तेजी

अवघ्या बारा दिवसात सोन्याच्या भावात तब्बल दोन हजारांची तेजी

Next

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील दोन दिवस ४८ हजार ९०० रुपयांवर स्थिरावलेल्या सोन्याच्या दरात शनिवारी तब्बल एक हजारांनी तेजी आली आहे. शनिवारी सोन्याचा भाव ४९ हजार ९०० रुपये प्रती तोळा (दहा ग्रॅम) राहिला. विशेष म्हणजे मागील बारा दिवसांच्या काळात सोन्याच्या भावात दोन हजारांची तेजी आली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात तणाव वाढत आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर पडला असून शुक्रवारी ४८ हजार ९०० रुपयांवर पाहिलेल्या सोन्याचे दर शनिवारी थेट ४९ हजार ९०० वर पोहोचले. ३१ जानेवारीला सोन्याचे दर प्रती तोळा ४८ हजार रुपये होता. तर शनिवार १२ फेब्रुवारीला सोन्याचा प्रती तोळा भाव ४९ हजार ९०० रुपये राहिला. एकूणच मागील बारा दिवसांच्या काळात सोन्याच्या दरात दोन हजारांची तेजी आली आहे.

कोरोना संकट काळात पहिल्या लॉकडाऊनमध्ये गाठली होती ५५ हजारी
-    कोरोना संकटामुळे जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊन दरम्यान सोन्याच्या भावाने ५५ हजारी गाठली होती. तर त्यानंतर वेळोवेळी सोन्याच्या भावात चढ-उतार राहिला. तर आता गुरुवार आणि शुक्रवारी ४८ हजार ९०० वर स्थिरावलेल्या सोन्याने शनिवारी तब्बल एक हजाराने मुसंडीच मारली आहे.

भाव ५५ हजारांवर जाण्याची शक्यता
-   रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आणखी वाढल्यास अल्पावधीतच सोन्याचे दर ५५ हजारांच्यावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. भाववाढीचा लग्नसराईच्या हंगामावर परिणाम होणार आहे.

३१ जानेवारीला ४८ हजारांवर सोन्याचे दर होते. गुरुवारी व शुक्रवारी सोन्याचे भाव ४८ हजार ९०० रुपये प्रती तोळा होते. तर शनिवारी सोन्याच्या भावात एकाएकी एक हजाराने तेजी आली. रशिया आणि युक्रेन यांच्यात तणाव वाढल्यास अल्पावधीतच सोन्याचे भाव ५५ हजार रुपये पार होण्याची शक्यता आहे.
- सौरभ ढोमणे, सराफा व्यावसायिक, वर्धा.

 

Web Title: In just twelve days, the price of gold has risen by a whopping 2,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं