अपुऱ्या मनुष्यबळाचा बँक ग्राहकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:06 PM2017-12-06T23:06:02+5:302017-12-06T23:06:17+5:30

परीसरात नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँक म्हणून एसबीआयची स्थानिक शाखा हा एकमेव पर्याय आहे.

Inadequate handicapped bank customers | अपुऱ्या मनुष्यबळाचा बँक ग्राहकांना फटका

अपुऱ्या मनुष्यबळाचा बँक ग्राहकांना फटका

Next
ठळक मुद्देनागरिकांच्या लागतात रांगा : पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमत
गिरड : परीसरात नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँक म्हणून एसबीआयची स्थानिक शाखा हा एकमेव पर्याय आहे. परंतु, सध्या या बँकेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे बँकेच्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता तात्काळ वरिष्ठांनी योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
या बँकेत परीसरातील ५२ गावांमधील हजारो नागरिकांचे खाते आहेत. बँकेत पाच कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत असले तरी कांबळे नामक कर्मचारी गत १५ दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले. परिणामी, चार कर्मचाºयांच्या खांद्यावर कामाचा बोझा आला. मात्र, गत आठ दिवसांपासून एक कर्मचारी रजेवर आले. त्यामुळे बँकेतील कमी मनुष्यबळाचा फटका या बँकेतील ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
येथील एसबीआयची शाखा फार जुनी असल्याने या बँकेत अनेकांनी आपले बचत खाते उघडले आहेत. नागरिकांकडून या बँक शाखेच्या माध्यमातून दररोज होणारी उलाढाल ही कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. नोटबंदीच्या आदेशानंतर या बँक शाखेत नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ती परिस्थिती सध्या नसली तरी बँकेत कर्मचारीच कमी असल्याने विविध अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. सदर बँकेत शेतमजुर, विद्यार्थी, जेष्ठ नागरीक आदींची बचत खाते असून बँकेत दररोज नागरिकांची गर्दी होत आहे.
बँकेत कार्यरत कर्मचाºयांवर ओढावलेला कामाचा अतिरिक्त ताण व नागरिकांना होणाऱ्यां अडचणी यातून मार्ग काढण्यासाठी बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ येथे पुरेसे मनुष्यबळ देत नागरिकांना व बँक कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी बँकेचे ग्राहक असलेल्या परिसरातील नागरिकांची आहे.

बँकेतील अपुºया मनुष्यबळाची माहिती आपण वरिष्ठांना दिली आहे. ते लवकरच यावर काही उपाययोजना करतील अशी आपणाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
- राजेंद्र बोरकर, शाखा व्यवस्थापक, एस.बी.आय. गिरड.

Web Title: Inadequate handicapped bank customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.