गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:11 AM2018-05-05T00:11:47+5:302018-05-05T00:11:47+5:30
अनुलोम अनुगामी लोकराज्य अभियान व ग्रामपंचायत दसोडा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत कोरा परिसरात साखरा, पिपरी व दसोडा या गावांत ही योजना राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरा : अनुलोम अनुगामी लोकराज्य अभियान व ग्रामपंचायत दसोडा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत कोरा परिसरात साखरा, पिपरी व दसोडा या गावांत ही योजना राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरिता स्वत: जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाला सरपंच कवडु मांडवकर, तहसीलदार दीपक कारंडे, लघुसिंचन उपविभागीय अभियता घसे, अनुलोम उपविभागीय जनसेवक अश्विन सव्वालाखे, अनुलोम भाग जनसेवक हिंगणघाट प्रवीण पोहाणे, श्रीकांत कुबडे, दासु साबळे, शिलवंत गोवारकर, विलास लोहकरे, ग्रामसेवक कांबळे, स्थानमित्र, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, तलाठी व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
गाळमुक्त गावातील तलाव असल्यामुळे पाण्याची समस्या मोठ्या प्रमाात दूर होईल व गाळयुक्त शिवारामुळे उत्पन्न भरभराटीस येईल. या उपक्रमातून या कार्यातून गावाचा विकासच होईल. यात काहीही शंका नाही. गावातील सरपंच व गावकºयांने या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दन नवाल यांनी आभार मानले.
धरणातील गाळ शेतात टाकण्याचे आवाहन
या योजनेत धरणातील गाळ उपसल्याने पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. शिवाय शेतातून, नाल्यातून वाहत आलेला गाळ धरणाच्या बाहेर येणार आहे. तो शेतात टाकल्यास शेताची सुपिकता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे धरणातून काढण्यात येत असलेला गाळ शेतकºयांनी शेतात टाकण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी यावेळी केले.