जिल्हास्तरीय खेळ, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:51 PM2018-01-11T23:51:15+5:302018-01-11T23:52:46+5:30
स्थानिक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांचे खेळ, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आंजी (मोठी) : स्थानिक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांचे खेळ, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी होते. यांच्यासह स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षण सभापती जयश्री गफाट, तर प्रमुख अतिथी म्हणून आ. रणजीतदादा कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, कृषी सभापती मुकेश भिसे, समाज कल्याण सभापती निता गजाम, प.सं.च्या सभापती महानंदा ताकसांडे, प.सं. राजेंद्र डोळसकर, वंदना बावने, सरपंच जगदीश संचेरिया, जि.प. सदस्य नुतन राऊत, धुर्वे, शिक्षणाधिकारी इंगोले, प्राचार्य अडकिने, इंगळे इतर उपस्थित होते.
प्रारंभी मशाल प्रज्वलन करून अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आठ तालुक्यातील आठ पथकांनी मान्यवंदना दिली. यानंतर मैदानाचे पुजन करण्यात आले. मान्यवराचे स्वागत सुकळी (बाई) येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गिताने केले. प्रा. शाळा बोरगाव(मेघे) व केंद्रीय शाळा आंजीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. तसेच खेळाडू व पंचाना शपथ देण्यात आली. यावेळी जि.प. शाळा बेलगाव येथील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या काव्य पुस्तकाचेही विमोचन करण्यात आले. तसेच उड्डान स्पर्धेअंतर्गत दिल्लीवारी करणारी भाविका गुरुनुले उच्च प्राथमिक शाळा धोत्रा(कासार) हिने मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी जि.प. च्या शिक्षण विभाग चांगले कार्य करत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील शाळा १०० टक्के डिजीटल करण्याचे आवाहन करून सर्वपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. खा. रामदास तडस यांनी आपल्या मनोगतात क्रीडाला महत्त्वपूर्ण स्थान देत त्यावर प्रत्येकाने लक्ष द्यावे. जि.प. शाळाच्या गुणवत्ता सुधारणेसाठी सर्वपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आ. कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागताध्यक्ष जयश्री गफाट यांनी शिक्षण विभागाच्या उपकमाची माहिती दिली. सीईओ नयना गुंडे यांनी क्रीडा हा विद्यार्थी जीवनातला महत्त्वाचा भाग असून तो अविस्मरणीय करण्याचे आवाहन केले.
यावेळी जि.प.च्या शाळाना जमनालाल बजाज फाउंडेशन तर्फे शाळांना भौतिक सुविधा पुरविण्याबाबत महत्त्वाचे कार्य करणारे समन्वयक दिनेश काकडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
प्रास्तविक शिक्षणाधिकारी डॉ. इंगोले यांनी केले. संचालन रफीक शेख यांनी केले तर आभार गट शिक्षणाधिकारी कोडापे यांनी मानले. कार्यक्रमाला पदाधिकारी, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.