प्रवासादरम्यान वृद्धेच्या पर्समधून सोन्याचा गोफ अन् रोकड लंपास, मलकापूर येथील घटना
By चैतन्य जोशी | Updated: March 1, 2023 17:00 IST2023-03-01T17:00:14+5:302023-03-01T17:00:23+5:30
वयोवृद्ध महिला बसमधून प्रवास करीत होती. वाहक तिकिट देण्यासाठी तिच्याजवळ गेला.

प्रवासादरम्यान वृद्धेच्या पर्समधून सोन्याचा गोफ अन् रोकड लंपास, मलकापूर येथील घटना
वर्धा :
वयोवृद्ध महिला बसमधून प्रवास करीत होती. वाहक तिकिट देण्यासाठी तिच्याजवळ गेला. ती थैलीतून पर्स काढत असतानाच तिला पर्स दिसून आली नाही. हे पाहून तिच्या पायाखालची वाळूच सरकली. अज्ञात चोरट्याने प्रवासादरम्यान वयोवृद्ध महिलेची पर्सच चोरुन नेली. पर्समध्ये सोन्याचा गोफ अन् १२ हजार ५०० रुपये रोख होती. मलकापूर गावाजवळ ही घटना उघडीकस आली. याप्रकरणी २८ रोजी महिलेने पुलगाव पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली.
कांताबाई केशव फटिंग (६४) रा. नाचणगाव या पुलगाव बसस्थानकावरुन अमरावती-हिंगणघाट बसमध्ये बसली. बस धावत असतानाच मलकापूर गावाजवळ वाहक तिकिट काढण्यासाठी तिच्याजवळ आला कांताबाई तिच्याजवळील थैलीत पैसे असलेली पर्स शोधू लागली. पण, पर्स मिळाली नाही. चोरट्याने पर्समधील सोन्याचा गोफ अन् १२ हजार ५०० रुपयांची रोकड असा एकूण ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरुन नेल्याचे समजले. कांताबाई पुलगाव येथे उतरली आणि याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.