कर्जमाफीतून नाव सुटलेल्यांची नावे यादीत समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:41 AM2018-06-21T00:41:51+5:302018-06-21T00:41:51+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेच्या कर्जमाफी यादीतून नावे सुटलेल्या शेतकऱ्यांची नावे कर्ज वितरणाच्या यादीत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

Include the names of the escape recipients listed on the loan | कर्जमाफीतून नाव सुटलेल्यांची नावे यादीत समाविष्ट करा

कर्जमाफीतून नाव सुटलेल्यांची नावे यादीत समाविष्ट करा

Next
ठळक मुद्देराकाँची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेच्या कर्जमाफी यादीतून नावे सुटलेल्या शेतकऱ्यांची नावे कर्ज वितरणाच्या यादीत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तालुक्यातील शेतकºयांना पिक कर्जाचे वाटप त्वरीत करण्यात यावे या मागणीचे निवेदन माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात राकाँच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाºयांना दिले. पिक कर्ज वितरणात विदर्भ माघारलेला असून १० हजार ८० कोटीचे उद्दीष्ट असताना केवळ ४ हजार कोटी रूपये कर्ज वाटप झाले आहे. वर्धा जिल्ह्यात ८५० कोटीचे उद्दीष्ट असताना केवळ ५० कोटी रूपयाचे वाटप करण्यात आले. शेतकºयांना वारंवार बँकेत येरझारा घालाव्या लागत आहे. असेही राकाँने म्हटले आहे.
निवेदन देताना गजानन गलांडे, अमोल गायकवाड, अनंता बोबडे, गजानन सातपुते, ऋषी थूल, गजानन बोबडे, मधुकर कुटे, केशव बुरीले, संभाजी देवढे, कविता वानखेडे, सुधीर सायंकार, राहुल दौलतकर, बाळा दौलतकर आदी उपस्थित होते.

Web Title: Include the names of the escape recipients listed on the loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.