रेल्वेस्थानकांवरील फलाटांची उंची वाढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 06:00 AM2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:09+5:30
मध्यरेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल पाहणी दौऱ्याकरिता वर्ध्यात आले होते. यावेळी त्यांनी वर्ध्यासह सेवाग्राम रेल्वेस्थानकाच्या पाहणी दरम्यान खासदार तडस यांनी मित्तल यांच्याशी विविध मुद्दयावर चर्चा केली. तसेच वर्धा, सिंदी, तुळजापूर, सेवाग्राम, पुलगांव, हिंगणघाट या रेल्वेस्थानकावर मेल व एक्सप्रेस दर्जाच्या विविध गाड्यांना थांबा मिळवा. सुरक्षिततेकरिता सिसिटीव्ही यंत्रणा लावावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विभागाशी निगडीत विविध समस्या प्राधान्याने मार्गी लागावे म्हणून रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे तसेच ज्या रेल्वे स्थानकांवर फलाटांची उंची कमी किंवा नाहीच्या बरोबर आहे. अशा रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासनाने तातडीने फलाटांची उंची वाढविण्याकरिता उपाययोजना कराव्या, अशा सूचना खासदार रामदास तडस यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्यासह रेल्वे प्रशासनाला दिल्या.
मध्यरेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल पाहणी दौऱ्याकरिता वर्ध्यात आले होते. यावेळी त्यांनी वर्ध्यासह सेवाग्राम रेल्वेस्थानकाच्या पाहणी दरम्यान खासदार तडस यांनी मित्तल यांच्याशी विविध मुद्दयावर चर्चा केली. तसेच वर्धा, सिंदी, तुळजापूर, सेवाग्राम, पुलगांव, हिंगणघाट या रेल्वेस्थानकावर मेल व एक्सप्रेस दर्जाच्या विविध गाड्यांना थांबा मिळवा. सुरक्षिततेकरिता सिसिटीव्ही यंत्रणा लावावी. रेल्वे आरक्षण केंद्रावर पिएनआर मशिन तसेच स्वयंचलीत तिकीट यंत्रणा सुरु करावी. तुळजापूर रेल्वेस्थानकजवळील पादचारी पुलाचा प्रश्न निकाली काढाव. नागपूर-वर्धा-नागपूर ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाला गती द्यावी. आर्वी-पुलगाव ब्रॉडगेज कार्याला प्रारंभ करावा. आर्वी-वरुड नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला अंतिम रुप देवून कार्य मंजूरी द्यावी. रेल्वे क्रासिंग व भुयारी मार्गांचे विविध विषय. वर्धा-नांदेड नवीन रेल्वे मार्गाचा आढावा. सेवाग्राम ते बल्लारशाह व वर्धा ते नागपूर तिसºया नवीन रेल्वे मार्गाचा आढावा यासह विविध मागण्यांचे पत्रही त्यांना दिले.
महाप्रबंधकांनी खासदारांच्या कामाचे केले कौतुक
खासदार रामदास तडस यांनी आपल्या स्थानिक विकास निधीअंतर्गत मतदार संघातील रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी स्टेनलेस स्टिलचे ४०० पेक्षा जास्त बेंचेस उपलब्ध करुन दिले. त्यामुळे मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल व मध्य रेल्वे नागपूर विभागाचे मंडळ रेल्वे प्रबंधक सोमेश कुमार यांनी खासदार तडस त्यांचे कौतूक केले. महाप्रबंधकांनी सकारात्मक चर्चा करुन आश्वासन दिल्याने या भेटीचा लाभ होणार असल्याचा विश्वास खासदार तडस यांनी व्यक्त केला आहे.