जिल्ह्यासाठी पॅक हाउसचे लक्ष्यांक वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 08:17 PM2018-12-26T20:17:34+5:302018-12-26T20:18:25+5:30
पश्चिम महाराष्ट्रातील योजनांचे विशेष लक्ष्यांक देण्यात येते, मात्र विदर्भातील शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली जातात, असा आरोप करीत जिल्ह्यांला पॅक हाऊसचे लक्ष्यांक वाढवून देण्याच्या मागणीकरिता तालुका कृषी अधिकारी यांना बळीराजा संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पश्चिम महाराष्ट्रातील योजनांचे विशेष लक्ष्यांक देण्यात येते, मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात, असा आरोप करीत जिल्ह्यांला पॅक हाऊसचे लक्ष्यांक वाढवून देण्याच्या मागणीकरिता तालुका कृषी अधिकारी यांना बळीराजा संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.
कृषी योजनांचा अल्प लक्ष्यांक नियमित पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना दिला जातो. परिणामी शेतकरी आर्थिक उन्न्तीपासून वंचित आहे. वर्धा जिल्ह्यातील पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी पॅक हाउस मिळविण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, जिल्ह्याला केवळ ३१ पॅक हाऊसचे लक्ष्यांक आले. यातील शेकडो शेतकऱ्यांना या योजनेपासून मुकावे लागले. समुद्रपूर तालुक्यात ८२ शेतकºयांनी पॅक हाउस योजनेसाठी अर्ज केले होते. यातील ६० अर्ज पात्र ठरले. तर तालुक्याला पाच पॅक हाउसचे लक्षांक आल्याने केवळ पाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागल्याने या योजनेचा जिल्ह्यासाठी लक्ष्यांक वाढवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
समुद्रपूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात या योजनेची सोडत झाल्यावर संतप्त शेतकऱ्यांनी लक्ष्यांक वाढीच्या मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी आर. पी. धनविजय यांना बळीराजा संघटनेचे गजानन गारघाटे यांच्या नेतृत्वात निवेदन दिले. यावेळी संजय तुराळे, मधुकर भोयर, बाबाराव राऊत, ज्ञानेश्वर हांडे, सुनील राऊत, श्यामराव रोहणकर, प्रशांत तामगाडगे, अनिल कावळे, नत्थू कोल्हे, जितेंद्र पंढरे, सतीश पोफळे, गणेश भोयर, शेषराव मुराडे, हरिदास राऊत, राजू राऊत, रामलाल गुंडे आदी शेतकºयांची उपस्थिती होती.