भारत आजपर्यंत अखंड तो केवळ संविधानामुळेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 11:59 PM2018-12-05T23:59:32+5:302018-12-06T00:00:04+5:30
जगातील अनेक राष्ट्रांचे विभाजन झाले. संस्कृतीच्या नावावर पाकीस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला. परंतु, भारतामध्ये इतकी धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विविधता असतांनाही भारत आजपर्यंत अखंड आहे. याचा सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचे संविधान आहे,....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जगातील अनेक राष्ट्रांचे विभाजन झाले. संस्कृतीच्या नावावर पाकीस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला. परंतु, भारतामध्ये इतकी धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विविधता असतांनाही भारत आजपर्यंत अखंड आहे. याचा सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचे संविधान आहे, असे प्र्रतिपादन संविधान सभाचे अनुवादक तथा जेष्ठ विचारवंत प्रा. देविदास घोडेस्वार यांनी केले.
परिवर्तनधारा साहित्य, कला मंचाच्यावतीने स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात संविधान सन्मान समारोहाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई तर प्रमुख अतिथी म्हणून वंदना संघाचे प्रा. रेवनदास लोखंडे, प्रा. तुळशीदास रंगारी, प्रा. राजेश डंभारे, रूपाली कांबळे आदींची उपस्थिती होती.
संविधानापुढील आवाहने, आमचे भविष्य, आमची जबाबदारी या विषयावरील व्याख्यानात पुढे बोलताना प्रा. घोडेस्वार म्हणाले, नेपाळ, दक्षिण अफ्रिका, इजिप्त, इंग्लड, जर्मनी, सिरीया आदी राष्ट्राची एकात्मता कायम कशी ठेवता येईल. याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्दारा निर्मित भारतीय संविधानाकडे आदर्श म्हणून बघतात; पण सविधानाला नष्ट करण्याचा अधिकार कुणालाही नसतांना काही प्रवृत्ती संविधान नष्ट व्हावे किंवा विद्रुप व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. तेव्हा आम्ही भारतीय म्हणून आमची जबाबदारी काय? हे वेळीच ओळखले पाहिजे. संविधानाबाबत जनजागृती करून त्याचा अंमल करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आरक्षण जर ५० टक्के वर गेल तर आर्थिक मागासलेपण हे सामजिक मागास लेपणाच्या तत्वाला बाधक ठरण्याच्या ईशाराही त्यांनी यावेळी दिला. प्राचार्य डॉ. मिलींद सवाई यांनीही यावेळी विचार मांडले. दिलीप कांबळे यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. संचालन प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण वानखेडे यांनी मानले.